Agriculture news in marathi Uday Shelke as the Chairman of Nagar District Bank | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय गुलाबराव शेळके (पारनेर) यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे समर्थक माधवराव कानवडे (संगमनेर) यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय गुलाबराव शेळके (पारनेर) यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे समर्थक माधवराव कानवडे (संगमनेर) यांची बिनविरोध निवड झाली आहे. शनिवारी (ता.६) दुपारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. 

बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. संचालक मंडळाच्या १७ जागा बिनविरोध झाल्या. तर चार जागांसाठी निवडणूक झाली. चार पैकी दोन जागा भाजपला व दोन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या. इतर जागा बिनविरोध झाल्या तरी शेळके यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यात त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. जिल्हा जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली.

या सभेत अध्यक्षपदासाठी उदय गुलाबराव शेळके यांचा तर माधवराव कानडे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. निवडीआधी आधी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची नावे निश्चित करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बैठक झाली.

बैठकीत ठरलेल्या नावांना वरिष्ठ पातळीवरून होकार आल्यावर नावे जाहीर करण्यात आली. पारनेरमधील उदय शेळके मुंबईतील जीए महानगर बँकेचे अध्यक्ष आहेत. संगमनेरचे माधवराव कानवडे ज्येष्ठ नेते असून, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत.


इतर बातम्या
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...