साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक

साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांनी सलग तीन वेळा विजय मिळवत खासदारकीची हॅटट्रिक केली. त्यांनी सायंकाळी ७ पर्यंत ७ लाख ७१ हजार ७७० मते मिळवत प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला. पहिल्या फेरीपासून उदयनराजेंनी मतांची घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. 

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग मार्चमध्ये फुंकले गेल्यानंतर जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले होते. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजे भोसले, शिवसेना - भाजप युतीकडून नरेंद्र पाटील, बळिराजा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रत्यक्षात उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील या दोघांमध्ये सामना रंगला. २३ एप्रिलला मतदान झाल्यानंतर विजय, मताधिक्‍य तसेच उदयनराजेंनी लाखभरातचे मताधिक्‍य मिळेल, ते उदयनराजेंना धक्‍का बसेल, येथपर्यंत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत होत्या. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. 

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याने जिल्हावासीयांबरोबर राज्यभरातील राजकीय क्षेत्राशी निगडित, उदयनराजेप्रेमींमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंनी आघाडी घेतली. त्यानंतर फेरीनिहाय ही आघाडी एक ते दीड हजार मतांनी वाढतच गेली. 

दोघांमध्ये चुरस असल्याने गर्दी होण्याची शक्‍यता गृहीत धरून प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोठा फौज फाटा उभा केला होता. मात्र, रखरखत्या उन्हात बाहेर न पडता कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक मीडियावरच माहिती जाणून घेण्यात धन्यता मानली. दुपारी १२ च्या सुमारास उदयनराजेंनी तब्बल ३५ हजार मतांची आघाडी घेतल्याने उदयनराजेंचा विजय निश्‍चित मानला जाऊ लागला. 

मताधिक्‍य घटले  सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत  उदयनराजे भोसले यांना ५ लाख ७१ हजार ७७०, नरेंद्र पाटील यांना ४ लाख ४६ हजार ६९२ मते मिळाली. १ लाख २५ हजाराच्या मताधिक्‍याने उदयनराजे भोसले आघाडीवर होते. गत निवडणुकीत उदयनराजेंना तीन लाख ६६ हजार ५९४ मताधिक्‍य मिळाले होते. यात मात्र लक्षणीय घट झाली. 

हे चित्र दिसलेच नाही  मतमोजणी केंद्राबाहेर होणारी कार्यकर्त्यांची गर्दी, गुलालाची दुकाने, कार्यकर्त्यांचा जल्लोष, हे निकालादिवशी वर्षानुवर्षे पाहण्यास मिळणार चित्र आज दुपारपर्यंत कोठेही दिसले नाही. कडक उन्हामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोबाईल आणि दूरदर्शन संचाकडे डोळे लावून बसण्यातच धन्यता मानली. बहुतेकांनी घरात बसून निकाल पाहण्यात, ऐकणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यावर गटागटाने कोठे उभे राहून चर्चा करणारी माणसे कोठे तरीच तुरळक दिसत होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com