agriculture news in marathi, uddahav thachakary speaks about crop insurance scheme, mumbai, maharashtra | Agrowon

पीकविमा योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी : उध्दव ठाकरे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांनाच संपूर्ण लाभ मिळाला पाहिजे. सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा. हा पैसा सरसकट मिळावा नाहीतर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा. ही योजना म्हणजे विमा कंपनी बचाव योजना नाही.
- उध्दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.

मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीकविमा योजनेमध्ये घोटाळा होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी. शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर सत्ता व युती काय कामाची असा इशाराही श्री. ठाकरे यांनी दिला. 

मुंबईत शुक्रवारी (ता. २३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेच्या प्रामाणिकतेबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, की जून महिन्यात पीकविमा योजनेबाबत शिवसेनेने मोर्चा काढला होता. त्यात पंधरा दिवसांची मुदत कंपन्यांना दिली होती. शिवसेनेचे सर्व खासदार याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि योजनेत काय सुधारणा करता येईल हे सांगितले. शिवसेनेने प्रत्येक  तालुक्यात पीकविमा मदत केंद्रे उभारली होती. पीकविमा योजनेत ५३ लाख शेतकरी पात्र तर ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. शिवसेनेने पीकविम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मदत झाली. मात्र, शेतकऱ्यांना देणे असलेले २००० कोटी रुपये कंपन्यांकडे अजून पडून आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांची आहे. पीकविमा योजनेमध्ये दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात, तर उर्वरित ९८ टक्के रक्कम सरकारकडून दिली जाते. मात्र, विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. शिवसेनेकडे या योजनेबद्दल तक्रारी आल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

पीकविमा योजना हा घोटाळा आहे. या योजनेतील झारीतील शुक्राचाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसेच ९० लाख शेतकऱ्यांना कोणी अपात्र ठरवले. त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज आहे. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. नफा कमावण्यासाठी विमा कंपन्या नाहीत. एक रुपयाचीही गुंतवणूक या कंपन्यांची नसताना नफा कशासाठी  असा सवालही श्री. ठाकरे यांनी केला.

वाशीम जिल्ह्यातील महिला शेतकरी सोनाली राठोड यांना दोन एकराला १०२ रुपये भरपाई मिळाली, अशाप्रकारे हा घोटाळा सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना आम्ही पैसे मिळवून दिले आहेत, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुष्काळ आणि पूर सरकारला दिसत आहे पण या कंपन्या दिसत नाही का? या योजनेअंतर्गत ज्या सुधारणा गरजेच्या आहेत त्याबद्दल पंतप्रधानांशी बोलू, जर कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर या विरोधात शिवसेना आंदोलन करेल असा इशाराही श्री. ठाकरे यांनी दिला.
 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...