शेतकऱ्यांचा ‘सात-बारा’ कोरा करणार : उध्दव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

मुंबई : राज्यात तीनशे युनिटपर्यंतच्या घरगुती वीज वापराचा दर शिवसेना ३० टक्क्यांनी कमी केल्याशिवाय राहणार नाही. तसेच शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजेत आणि पुन्हा सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात - बारा उतारा कोरा करणार, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. 

राज्यात पुन्हा शिवसेनेला सत्ता हवीच आहे, असे सांगत कुचराई करू नका, प्रामाणिकपणे काम करून विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन या वेळी त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दसऱ्याच्या निमित्ताने सुरू झाली. शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी पार पडला. या वेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. राम मंदिराचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यासोबतच अजित पवार, शरद पवार यांच्यावर श्री. ठाकरे यांनी सडकून टीका केली. तिकीट कापलेल्यांची माफी देखील त्यांनी या वेळी मागितली.

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रामध्ये ३०० युनिटचा घरगुती वीज वापराचा दर शिवसेना ३० टक्क्यांनी कमी केल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांना बससेवा देणार, १ रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे महाराष्ट्रभर सुरू करणार. मागे जशी १ रुपयामध्ये झुणका- भाकर ही एक घोषणा होती, तसेच राज्यातील गोरगरिबांना १० रुपयांमध्ये चांगल्या अन्नाची थाळी सुद्धा देणार. शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजेत आणि पुन्हा सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा ‘सात - बारा’ कोरा करणार अशी आश्‍वासने त्यांनी दिली. चंद्रकांत पाटील बोलले होते, आमची अडचण समजून घ्या, आम्ही तुमची अडचण समजून घेतली. तुम्ही आता महाराष्ट्राची अडचण सोडवा, आम्ही आहोत तुमच्यासोबत, असेही श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या कर्माने त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आजपर्यंत मगरीच्या डोळ्यात पाणी ऐकले होते. अजित पवार यांच्या डोळ्यात आज पाणी येते, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी येत होते, तेव्हा तुम्ही कुठले पाणी दाखवले होते? आज ‘ईडी’चे राजकारण पवार तुम्हाला सुडाचे वाटते, मग २००० मध्ये महाराष्ट्राला का छळले, असे सवालही श्री. ठाकरे यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com