agriculture news in Marathi, Uddhav Thackarey says, initiative will be taken for corn process and cotton hub, Maharashtra | Agrowon

मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहबसाठी प्रयत्न करू : उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

सिल्लोड, जि. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर युतीचे सरकार सत्तेवर आल्यास गावागावांत उद्योगधंदे व बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहब तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

सिल्लोड, जि. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर युतीचे सरकार सत्तेवर आल्यास गावागावांत उद्योगधंदे व बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहब तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ सिल्लोड येथे रविवारी (ता. १३) जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उमेदवार अब्दुल सत्तार, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. मच्छिंद्र पाखरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

श्री. ठाकरे म्हणाले, की शिवसेना परंपरा घेऊन चालणारा पक्ष आहे. युती झाल्यानंतर शिवसेनेला जागा सुटल्यामुळे शिवसेना ही जागा लढते आहे. ही निवडणूक जनतेच्या हातात असून, शिवसेनेचा वाघ एकटा लढून जिंकतो, काळजी करू नका, लढायचे व जिंकायचे. ठाकरे घराण्याची परंपरा खरे बोलण्याची आहे. त्यामुळे जे बोलेन ते करेन. सत्तारभाई विचाराने सोबत आहेत. त्यामुळे सत्तार आपल्या सोबत असून उद्या सत्तारांसोबत आपली सत्ताही येणार आहे. युती केली आहे केलीच ना पुढील काळात सर्वसामाण्यांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक रुपयामध्ये प्राथमिक तपासणी चाचणी सेवा गोरगरिबांसाठी उपलब्ध करून देणार आहे. गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी यानिमित्ताने घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आहे.

गतकाळात दीड कोटी शेतकऱ्यांपैकी ९० लाख शेतकऱ्यांना पीकविमा देण्यापासून अपात्र ठेवण्यात आले होते. २ हजार कोटी रुपयांवर पीकविमा कंपन्यांनी डल्ला मारला होता. शिवसेनेने याविषयी लक्ष घालून मोर्चे काढून पीकविमा कंपन्यांना ताळ्यावर आणले. यामुळे शेतकऱ्यांना ११०० कोटी रुपयांचा पीकविमा मिळाल्याचा उल्लेख श्री. ठाकरे यांनी केला.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...