सत्तेत समान वाटा हवा ः उद्धव ठाकरे

सत्तेत समान वाटा हवा ः उद्धव ठाकरे
सत्तेत समान वाटा हवा ः उद्धव ठाकरे

मुंबई : लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्तास्थापनेचा दावा करण्यात येईल, असा इशारा देतानाच जागावाटपात समजून घेतले, आता सत्तावाटपात समजून घेणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. तसेच मला सत्तेची हाव नाही, त्यामुळे सत्तेसाठी वेडेवाकडे पर्याय स्वीकारणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर धुडकावून लावली.

शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेच्या जागावाटपावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते, आमची अडचण आहे, तेव्हा त्यांची अडचण समजून घेऊन आम्ही १२४ जागांवर युती केली. पण प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी सोडविणे मला जमणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार आता सत्तावाटप व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. 

हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतरच भाजपसोबत सत्तेची चर्चा केली जाईल, त्यानुसार दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील आणि सत्तावाटप ठरवतील. राज्यात पुढचा मुख्यमंत्री कुणाचा असणार, असा प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच विधानसभेच्या या निकालाने सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यांत अंजन घातलेले आहे. महाराष्ट्रातील जनतेने सगळ्यांचेच डोळे उघडले आहेत. निकालाने जे हवेत चालत होते, तेसुद्धा जमिनीवर आले आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेला हाणला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com