शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव तयार : उध्दव ठाकरे

पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीची पाहणी करताना उध्दव ठाकरे
पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीची पाहणी करताना उध्दव ठाकरे

लोहा, जि. नांदेड : कुणी मदत केली नाही तरी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी रडत न बसता एकत्र यावे. कर्जमाफी, पीकविमा आदींसह शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना जिल्हा तसेच तालुका स्तरावर मदत केंद्र सुरू करणार आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. ठाकरे मंगळवारी (ता. ५) नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी सोनखेड (ता. लोहा) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकरी श्री. ठाकरे यांना दाखविण्यासाठी मोड आलेली ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन आदी पिके घेऊन आले होते.

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की बियाणे, खते आदी कृषी निविष्ठांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी रडत न बसता एकत्र यावे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीही येत नाही. परंतु, कठीण परिस्थितीत शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या भागात शिवसेना मदत केंद्र सुरू केले जाईल, असे श्री. ठाकरे यांनी या वेळी सांगितले. 

या वेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परभणीचे आमदार राहुल पाटील, माजी आमदार रोहिदास चव्हाण, रामभाऊ चन्नावार, मुक्तेश्वर धोंडगे, छावाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, मिलिंद पवार, संभाजी चव्हाण, शिवाजी मोरे, अंकुश मोरे, गणेशराव बावने, योगेश मोरे उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी सोनखेड, जानापुरी, आंबेसांगवी, पार्डी, लोहा, किरोडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com