agriculture news in marathi, uddhav thackery take review of damaged crops, sangli, maharashtra | Agrowon

राज्यात शेतकरी मदत केंद्रे उभारणार : उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मी इथं आलो आहे. शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. त्या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांची नोंद करून ती माझ्याकडे पाठवावी त्यावर तोडगा काढला जाईल.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.

कडेगाव, जि. सांगली  : अतिवृष्टी व मॉन्सूनोत्तर पावसाने सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकवार नुकसानभरपाई मिळायला हवी ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी राज्यभरात शेतकरी मदत केंद्रे उभारली जातील. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये; खचून जाऊ नये. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. १५) नेवरी (ता. कडेगाव) येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच मदतीचेही आश्वासन दिले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विश्वजीत कदम, मोहन कदम, अनिल बाबर, मिलिंद नार्वेकर, संजय विभूते उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की सांगली जिल्ह्यात पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. संकटसमयी शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझी धडपड सुरु आहे. परंतु, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आलो आहे. शेतकऱ्यांना पिकवार नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...
एकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात...कोल्हापूर  : जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा...
पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षापुणे : पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी...
सांगलीत तीनशे सौर कृषिपंप सुरूसांगली  : वीजपुरवठा नसतानाही दिवसा पिकांना...
ऊसदर आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहीलसातारा : ऊसदरासह इतर प्रश्‍नांवर चर्चा...
रब्बीसाठी ‘वान’चे पाणी देण्याची...बुलडाणा : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान...
सातारा जिल्ह्यात ‘एफआरपी’चा प्रश्‍न...कऱ्हाड  : साखर कारखान्यांत ऊस गाळप...
काटेपूर्णाच्या कालव्यांची दुरुस्ती...अकोला : यंदाच्या रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा...
धान खरेदीवरून गृहमंत्र्यांनी...नागपूर  : गोंदिया जिल्हात धान खरेदी...
बुलडाण्यात दोन कोटींची नुकसान भरपाईबुलडाणा  : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या...
शासकीय खरेदीअभावी उत्पादकांची लूटआरेगाव, जि. यवतमाळ  : आज ना उद्या शासन...
यवतमाळमध्ये पन्नास हजार क्विंटल कापूस...यवतमाळ : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या सीसीआय...
‘द्वारकधीश’कडून पंधरवड्यात ५५ हजार टन...नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश...
`ऊर्जामंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा...नाशिक : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ३...
किनवट येथे धानाचे खरेदी केंद्र मंजूरनांदेड : धान खरीप पणन हंगाम २०२० - २१ साठी...
‘इसापूर’चे पहिले आवर्तन शुक्रवारपासूननांदेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूरमधून...
खानदेशात मका, ज्वारीला हमीभाव मिळेना जळगाव : खानदेशात ज्वारी, मक्याची आवक बाजारात सुरू...
परभणी जिल्ह्यात तीस हजार हेक्टर ऊस...परभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये लागवड...