agriculture news in Marathi uddhav thakaray abd sharad pawar wil visit to rain affected area Maharashtra | Agrowon

मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यावर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (ता.१९) सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (ता.१९) सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून (ता.१८) दोन दिवस मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी १०:४५ वाजता सांगवी खुर्द येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते ११:०० वाजता बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी करतील. ११:३० वाजता अक्कलकोट शहर येथे हत्ती तलावाची पाहणी, त्यानंतर दुपारी १२ वाजता रामपूर अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दुपारी १२:३० वाजता बोरी उमरगे येथे आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, दुपारी ३ वाजता पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी घेणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शरद पवार शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. आज (ता.१८) 
सकाळी खासदार पवार हे बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत. रात्री तुळजापूरला मुक्काम केल्यानंतर सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा तुळजापूर परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी परांडा गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. 
 

 
 


इतर अॅग्रो विशेष
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...