बिडकीन परिसरात ५०० एकरांवर अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी: मुख्यमंत्री ठाकरे

chief minister
chief minister

औरंगाबाद : मराठवाड्यातील लघुउद्योगांना चालना देण्याचे काम सरकार करेल. औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन परिसरात पाचशे एकरांवर अन्नप्रक्रिया उद्योग उद्यानाची उभारणी केली जाईल, त्याचे भूमिपूजन जून २०२० मध्ये होईल. या ठिकाणी शंभर एकर क्षेत्र केवळ महिला उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. यासोबतच शेंद्रा एमआयडीसीमध्ये आधुनिक कौशल्यविकास संकुलाची उभारणी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. औरंगाबाद येथे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे (मासिआ) आयोजित सातव्या ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो २०२०’चे उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते.  मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले, आधुनिक पद्धतीच्या कौशल्यविकास संकुलाच्या माध्यमातून विविध उद्योगांना लागणाऱ्या कुशल कामगारांची उभारणी केली जाईल. त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराचे साधन निर्माण होण्यास मदत होईल. देशातील उद्योजकांशी आपला संवाद झाला. सरकार म्हणून लघुउद्योजकांनी मांडलेल्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. कृषी आणि उद्योग जगत समन्वयातून काय करू शकेल याविषयी आपले काम सुरू आहे. प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून त्या उद्योगांना जे हवे तेच आपल्या मातीत पिकवून शेतीमालाच्या बाजारपेठेचा प्रश्न उचित दरासह निकाली काढण्याचा प्रयत्न आपण करू. तेलबिया प्रक्रिया प्रकल्प मराठवाड्यात उभे करता येतील का, याचीही चाचपणी सुरू आहे. मंदी आली म्हणून रडत बसून चालणार नाही. येणाऱ्या संकटावर मात करावीच लागेल. शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्‍तच नव्हे; तर चिंतामुक्‍त करण्याचा निर्धारही श्री. ठाकरे यांनी बोलून दाखविला.  श्री. देसाई म्हणाले, मराठवाड्यातील एमआयडीसीमध्ये उद्योगाच्या चार वसाहती निर्माण केल्या जातील. जवळपास १०१८ हेक्‍टरवर त्यांचा विस्तार असेल. उस्मानाबाद जिल्ह्यात टेक्‍निकल टेक्‍स्टाइल हब निर्माण केले जाईल. जालना जिल्ह्यातील जेएनपीटी ड्रायपोर्ट लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यात येत्या काळात ८३६० कोटींची गुंतवणूक उद्योगरूपात होणार आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीचे सेवा शुल्क कमी केले आहे. कृषी प्रक्रिया उद्योगात विद्यमान सरकारच्या काळात होईल, असा विश्वासही श्री. देसाई यांनी बोलून दाखविला. प्रास्ताविक उद्योजक सुनील किर्दक यांनी केले. मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे यांनी मसिआच्या आजवरच्या प्रवासाचा दाखला देत विचार व्यक्‍त केले.  चार दिवस चालणाऱ्या या एक्‍स्पोच्या उद्‌घाटनाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री संदीपान भुमरे, राजेश टोपे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, महापौर नंदकुमार घोडेले, खासदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अंबादास दानवे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंग राजपूत, नगरसेवक राजू शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com