agriculture news in marathi, udhav thacakry says to start help centers for farmers, mumbai, maharashtra | Agrowon

पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उभारा : उध्दव ठाकरे
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळालेला नाही. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी केंद्र उभारले. याच धर्तीवर जेथे मदत मिळाली नाही अशा ठिकाणी मदत केंद्र उभारून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळालेला नाही. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी केंद्र उभारले. याच धर्तीवर जेथे मदत मिळाली नाही अशा ठिकाणी मदत केंद्र उभारून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांची शुक्रवारी (ता. १४) बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. गेली साडेचार वर्षे आपण भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला. आता लोकसभा निवडणुकीत आपण त्यांच्याशी युती केली. विधानसभा निवडणुकीत ही युती कायम असणार आहे. विरोधकांकडून युतीबाबत अपप्रचार सुरू असून, त्याकडे लक्ष देऊ नका. युती म्हणून विधानसभेला आपल्याला एकत्र लढायचे आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आपल्याला विजय मिळवायचा आहे, असे श्री. ठाकरे म्हणाले.

पीकविमा काढूनही भरपाई मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. मराठवाड्यातील आपल्या जिल्हाप्रमुखांनी शेतकरी आणि संबंधित विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून मदत मिळवून देण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या साडेअकरा हजार शेतकऱ्यांपैकी साडेआठ हजार शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळाला. त्यामुळे राज्यभरात असे उपक्रम राबवा आणि पीकविम्याची रक्कम का मिळाली नाही? याचा जाब संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारा, असा आदेश श्री. ठाकरे यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...