उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी दुधनी, मंगळवेढ्यात खरेदी केंद्रे

अक्‍कलकोट तालुक्‍यातील मूग, उडीद, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दुधनी केंद्रात शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. १५ ऑक्‍टोबरनंतर प्रत्यक्षात खरेदीला सुरवात होईल. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सर्व तालुक्‍यांत एक हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. - बी. बी. वाडीकर, मार्केटिंग फेडरेशन, सोलापूर
उडीद, मूग,  सोयाबीन खरेदीसाठी दुधनी, मंगळवेढ्यात खरेदी केंद्रे
उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी दुधनी, मंगळवेढ्यात खरेदी केंद्रे

सोलापूर : गतवर्षी दुष्काळात उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी झाली. काही ठिकाणी झाली, पण पाण्याअभावी अपेक्षित उत्पादनच मिळाले नसल्याचे चित्र आहे. तरीही शेतकऱ्यांकडील उडीद, मूग व सोयाबीनची हमीभावातील खरेदीसाठी दूधनी, मंगळवेढा येथे खरेदी केंद्रे उघडण्यात येणार आहेत. 

जिल्ह्यात २८ खरेदी- विक्री संघ आहेत. परंतु, बहुतांश संघ कागदावरच कार्यरत आहेत. काही खरेदी- विक्री संघांकडे खेळते भांडवल नाही. बहुतांश संघांची स्वत:ची गोदामे नाहीत. मार्केटिंग फेडरेशनच्या आवाहनानंतर दुधनी व मंगळवेढ्यातील खरेदी-विक्री संघांनी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार सुरवातीला या दोन ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू होतील. 

हमीभाव केंद्रांना नाफेडकडून आता आयडी मिळेल आणि त्यानंतर पोर्टल सुरू झाल्यास शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होईल, असे सांगण्यात आले. १५ ऑक्‍टोबरपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार असून त्यानंतर शेतमालांची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.

मंगळवेढा केंद्राला मंजुरी मिळाली. मात्र, शेतकऱ्यांकडे उडीद, मूग, सोयाबीन काहीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंदाज घेऊन तेथे हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार आहे. बार्शी, कुर्डूवाडीतही केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com