नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपये

नगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांत भुसारची बऱ्यापैकी आवक झाली. उडदाची दर दिवसाला १३० ते १४० क्विंटलची आवक आहे.
Udid  rate 5000 to 6800  rupees in Nagar
Udid rate 5000 to 6800 rupees in Nagar

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांत भुसारची बऱ्यापैकी आवक झाली. उडदाची दर दिवसाला १३० ते १४० क्विंटलची आवक आहे. दर  ५ ते ६ हजार ८०० रुपये व सरासरी ५९०० रुपये मिळाला. मुगाची आवक अजून वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन, तुरीचे दर टिकून आहेत. भाजीपाल्याच्या दरात चढउतार सुरुच आहे. 

नगरमध्ये दर दिवसाला ४ हजार १०० ते ५ हजार क्विंटलपर्यंत भुसार मालाची आवक होत आहे. सध्या सर्वाधिक मुगाची ३ ते ४ हजार क्विंटलची आवक होत आहे. मुगाला ४ हजार २५० ते ७ हजार १०० रुपये व सरासरी ४ हजार ६२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गावरान ज्वारीची ११४ ते १५० क्विंटलपर्यंत आवक आहे. १९०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजरीची ६५ ते ८० क्विंटलची आवक होत असून १५६० ते १८०० रुपयाचा दर मिळाला. 

तुरीची १४ ते २० क्विंटलची आवक आहे. दर ५१०० ते ५८०० रुपये, हरभऱ्याची १५० ते १७० क्विंटलची आवक होऊन ४२५० ते ५ हजार रुपये, गव्हाची ३२८ ते ३५० क्विंटलची आवक होऊन १६९० ते १७११ रुपये दर मिळाला. सोयाबीनची १२ ते २० क्विंटलची आवक होऊन ७ हजार ते ८ हजार २००, चवळीला ५ हजार २००, मक्याला १७५० रुपये आणि गुळडागाला २९५० ते ४८०० रुपये दर आहे. 

भाजीपाल्याची दर दिवसाला ८०० क्विंटल आवक आहे. टोमॅटो, घेवडा, कोबी, सिमला मिरची, हिरवी मिरची, बटाटे, शेपू, मेथी, पालक, काकडी, कोबी यासह अन्य भाजीपाल्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. टोमॅटोला २०० ते ६००, वांग्यांना १ हजार ते २ हजार, काकडीला ५०० ते १८००, कारल्याला ६०० ते १२००, घेवड्याला ५०० ते १०००, बटाट्याला १००० ते १३००, शिमला मिरचीला ६०० ते १५००, हिरव्या मिरचीला १ हजार ते २ हजार रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com