उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला
उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला

नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर शनिवारी (ता. १४) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

उदयनराजे भोसले यांनी विकासासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगत दिल्लीत प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.

पंधरा दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेतली. त्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत राहतील अशा चर्चा सुरू झाल्या; परंतु अवघ्या काही तासांतच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या गोटातून बाहेर आले. 

शुक्रवारी त्यांनी ट्विटरवरून भाजपत प्रवेश करत असल्याचे अधिकृत जाहीर केले. विकासासाठी हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या ट्विटरला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना टॅग केले आहे. त्यामुळे साताऱ्यातील दोन्ही राजे पुन्हा एकाच पक्षात राहणार हे स्पष्ट झाले. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सोडून उदयनराजे भोसले यांना घेऊन दिल्ली गाठली. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.

शनिवारी सकाळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com