agriculture news in marathi Ujani area should be developed for tourism: Dr. Kulkarni | Page 3 ||| Agrowon

पर्यटनासाठी उजनी परिसराचा विकास व्हावा ः डॉ. कुलकर्णी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

सोलापूर ः ‘‘ खासगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने धरणावरील पर्यटन क्षेत्राला सादर करणे गरजेचे आहे,’’ असे मत जलपर्यटनतज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सोलापूर ः ‘‘उजनी धरणावरील भाग हा पर्यटनासाठी अत्यंत चांगला आहे. या ठिकाणी पर्यटन निर्माण झाल्यास रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी खासगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने धरणावरील पर्यटन क्षेत्राला सादर करणे गरजेचे आहे,’’ असे मत जलपर्यटनतज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

उजनी धरणावरील प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाबाबत जलपर्यटन तज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी व वन विभागाचे अधिकारी जयंत कुलकर्णी यांनी रविवारी (ता.२०) उजनी धरणावर एका बैठकीत सादरीकरण केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

उजनी धरणावरील शासकीय विश्रामगृहात डॉ. कुलकर्णी व जयंत कुलकर्णी यांनी उजनी धरणावरील प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रकल्पातील विविध मु्द्यांवर सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर शंभरकर यांनी आमदार शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह उजनी धरणात आमदार शिंदे यांच्या बोटीतून पाहणी केली. 

या बैठकीस उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पक्षी निरीक्षक व्यंकटेश मेतन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उबाळे, वैज्ञानिक डॉ. प्राची मेहता, सचिन लोकरे, बापूसाहेब शिंदे, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...