Agriculture news in marathi, The ujani canal burst, the crops destroyed | Agrowon

उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्त
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी दोन टिपर व एक जेसीबीद्वारे कालवा दुरुस्तीचे काम करून घेत आहोत. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल. 
- जितेंद्र बंकापुरे, उपविभागीय अभियंता

मोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ शाखेवरील सय्यद वरवडे येथील काळे वस्तीजवळ गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री फुटला. त्यामुळे सुमारे ४०० एकर शेतजमिनीमध्ये कालव्याचे पाणी शिरून शेतीचे मोठे नुकसान झाले. 

उजनी धरणातील पाणीपातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी नदी व कालव्यामार्फत सोडले जात आहे. उजनीच्या सय्यद वरवडे गावाजवळून वाहणाऱ्या डाव्या कालव्याच्या भरावाची माती खचली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून या ठिकाणाहून पाणी झिरपणे सुरूच होते. गुरुवारी मध्यरात्री हळूहळू पाझरत असलेल्या पाण्याच्या अधिक दाबामुळे हा भाग खचला. संपूर्ण परिसरात पाणी पसरले. परिणामी, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पाण्याचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने भरल्या. बांध फुटले, ऊस, मका, कांदा व अन्य पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री २.३० वाजता जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता डी. बी. साळे, कार्यकारी अभियंता एन. व्ही. जोशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या शाखेचे पाणी बंद करून कुरुल व बेगमपूर शाखेला सोडले आहे. 

 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...