agriculture news in marathi Ujani dam is hundred percent full | Agrowon

उजनी शंभर टक्के भरले; तरीही यंदा महिनाभर उशीर

वृत्तसेवा
गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021

गेल्या काही दिवसांपासून सोलापूरवासीयांच्या नजरा लागून राहिलेल्या आणि जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी मंगळवारी (ता. ५) रात्री अकरा वाजता अखेर शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली.

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापूरवासीयांच्या नजरा लागून राहिलेल्या आणि जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी मंगळवारी (ता. ५) रात्री अकरा वाजता अखेर शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली. दमदार पावसाअभावी यंदा तब्बल महिनाभर उशिराने धरण शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचले. या पाण्याचा सोलापूरसह पुणे आणि नगर जिल्ह्यांतील शेतीसह सुमारे सव्वाशेहून अधिक गावच्या पाणीपुरवठा योजनांना फायदा होतो. 

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणाकडून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर धरणाने शंभर टक्क्यांची पातळी गाठली. गेल्या पंधरवड्यापासून धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी-जास्त होत होता. पण त्यात सातत्य होते. याच सातत्यामुळे पाणीपातळीत वाढ होत गेली. मंगळवारी (ता. ५) रात्री १० च्या सुमारासही दौंडकडून धरणात सात हजार ६९३ क्युसेस विसर्ग उजनी धरणात मिसळत होता.

गतवर्षीच्या तुलनेत उजनी यंदा एक महिना ५ दिवस उशिराने भरले. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यात धरण भरते. यंदा मात्र जुलैपर्यंत धरण ५० टक्क्यांपर्यंतच होते. पण पुढे उर्वरित ५० टक्के धरण भरण्यासाठी भरण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधीला लागला. सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील इंदापूर, नगर जिल्ह्यातील कर्जत या भागातील शेतीसह सुमारे सव्वाशेहून अधिक पिण्याच्या पाणी योजना या पाण्यावर अवलंबून असतात. धरण आता शंभर टक्के भरल्याने या भागातील पाण्याची चिंता मिटली आहे.   
पाणीसाठा १००.६७ टक्क्यांवर
मंगळवारी रात्री उशिराने पाणीसाठ्याने शंभरीपर्यंत टक्केवारी गाठली. त्यानंतर बुधवारी (ता. ६) धरणात एकूण पाणीसाठा ११७.५९ टीएमसी झाला असून, त्यापैकी उपयुक्त साठा ५३.९३ टीएमसी, तर पाण्याची टक्केवारी १००.६७ टक्क्यांपर्यंत पोहोचली. 


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...