उजनीतून नदी, कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात

उजनी धरणातून कालव्यासह भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या धरणात ६१.०७ टक्के पाणीसाठा आहे.
उजनीतून नदी, कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात From Ujani to river, canal The water began to leak
उजनीतून नदी, कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात From Ujani to river, canal The water began to leak

सोलापूर : उजनी धरणातून कालव्यासह भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या धरणात ६१.०७ टक्के पाणीसाठा आहे. त्यापैकी उजनी कालव्यात ४०० क्युसेक तर भीमा-सीना जोड कालव्यात २०० क्युसेक असा विसर्ग सोडण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांत त्यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येत आहे. उजनीतून भीमेत सहा हजार तर कालव्याद्वारे ३ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. टाकळी बंधाऱ्यात २७ मार्चपर्यंत सोलापूर शहराला पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक होता. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदी काठावरील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्यासाठी, पशुधनासाठी आणि शेतीसाठी पाण्याची आवश्यकता होती. सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना चालू आहे. सध्या धरणात एकूण ९६.६०टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

वीस टीएमसी पाण्याचा होणार वापर सीना-माढा कालव्यासाठी दररोज २५९ क्युसेक, दहिगावसाठी १०५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या आवर्तनामध्ये नदीमधून दहा दिवसांत सहा टीएमसी, कालव्यातून एक महिन्यात सहा टीएमसी, सीना माढा उपसा सिंचन योजनेमधून एक टीएमसी, भीमा- सीना बोगद्यातून दीड टीएमसी व जलाशयाच्या बॅक वॉटरमधून चार टीएमसी असा पुढील एक महिन्यात धरणातील १८ ते २० टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. दहिगाव योजनेच्या पाण्याने लव्हे तलाव पहिल्यांदाच भरला करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथमच लव्हे गावातील तलावात आले. तलाव पहिल्यांदाच असा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्या पाण्याचे ग्रामस्थांनी पूजन केले. दहिगाव उपसा सिंचन योजना २०१७ मध्ये सुरू झाली.

तेव्हापासून या तलावाला दहिगाव योजनेचे पाणी प्रत्येक आवर्तनात कमी-अधिक प्रमाणात मिळत होते. मात्र, हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. मात्र, यावेळेस सोडलेल्या पाण्याने हा तलाव भरला आहे. सरपंच रंजना पाटील, मनीषा कवडे, सिंधू कवडे, कलावती कवडे, रंजना भांगे, राजूभाई भांगे, स्वाती भांगे, उषा भांगे, सुवर्णा भांगे, द्रौपदी कवडे, ज्योती भांगे, सुमन भांगे, नंदा भांगे, कांताबाई भांगे, नंदाबाई भांगे यांनी या पाण्याचे पूजन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com