उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या पाण्यामुळे उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम राहिल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी (ता.११) धरणामध्ये २७.६४ टक्के पाणीसाठा झाला होता.
Ujani water level at 28 percent
Ujani water level at 28 percent

सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या पाण्यामुळे उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम राहिल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी (ता.११) धरणामध्ये २७.६४ टक्के पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत मात्र यंदा पाणीसाठा कमीच आहे. गतवर्षी याचदिवशी धरणामध्ये १०५.१४ टक्के इतका साठा होता.  

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे उजनी धरणामध्ये दौंडकडून ४६६३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या आठवड्यात विसर्ग जवळपास १३ लाख क्युसेकपर्यंत होता. पण, या सप्ताहात तो कमी झाला असला, तरी त्यात सातत्य आहे. शिवाय पुणे भागातही थांबून-थांबून पाऊस पडतच आहे. परिणामी धरणाची पाणीपातळी हळूहळू वाढते आहे. गेल्यावर्षी धरणातील पाणी पातळी १०५.१४ टक्क्यावर होती. यंदा मात्र ही पातळी २८ टक्क्यावर आहे. 

गेल्या दोन दिवसापासून धरण कार्यक्षेत्रात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पण, रिमझिम पाऊस होतो आहे. त्यात जोर नाही.  गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ८० टक्के इतकी पाण्याची तूट आहे. ही तूट भरुन निघण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. पावसाचा हंगाम जवळपास निम्मा संपला आहे. परंतु, आता उर्वरित कालावधीत त्यासाठी आशा आहे. 

मंगळवारी धरणातील पाणी

एकूण पाणी पातळी ४९२.९७० मीटर
एकूण पाणीसाठा ७८.४७ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा १४.८१ टीएमसी
पाण्याची टक्केवारी २७.६४ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com