‘उजनी’तून सोडले सोलापूरसाठी पाणी

सोलापूर : सोलापूर शहरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी बुधवारी (ता.८) उजनी धरणातून १६०० क्युसेक इतके पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. पुढील दहा दिवस हे पाणी सोडले जाईल.
'Ujani' Water release for Solapur प्रतिकात्मक छायाचित्र
'Ujani' Water release for Solapur प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर : सोलापूर शहरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी बुधवारी (ता.८) उजनी धरणातून १६०० क्युसेक इतके पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. पुढील दहा दिवस हे पाणी सोडले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन यापूर्वी १० एप्रिलचे होते. मात्र, औज बंधाऱ्यातील पाणीसाठा पाहून हे नियोजन एक-दोन दिवस मागे-पुढे केले जाते. त्यानुसार बुधवारी सकाळी सहा वाजता १६०० क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. टप्प्या-टप्प्याने ते वाढवण्यात येऊन ते ८००० हजार क्युसेकपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. 

सध्या बोगद्यातून एक हजार १२५ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्याचबरोबर कालव्याच्या माध्यमातून तीन हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. पुढील १५ दिवस हे रोटेशन राहणार आहे. त्यानंतर ते बंद केले जाणार आहे. तर सोलापूरसाठी सोडण्यात येणारे पाणी १० दिवस राहणार आहे. त्यामुळे शहराला भेडसावणारी पाण्याची टंचाई कमी होणार आहे, असे सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com