उजनीचे पाणी हिप्परगा तलावात सोडले

सोलापूर ः उजनी धरणातून एकरूक उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात सोडलेले पाणी रविवारी (ता.६) कारंबा पंप हाऊस येथे पोहोचले. त्यानंतर हे पाणी पुढे हिप्परगा तलावात सोडण्यात येत आहे.
Ujani's water was released into Hipparga Lake
Ujani's water was released into Hipparga Lake

सोलापूर  ः उजनी धरणातून एकरूक उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात सोडलेले पाणी रविवारी (ता.६) कारंबा पंप हाऊस येथे पोहोचले. त्यानंतर हे पाणी पुढे हिप्परगा तलावात सोडण्यात येत आहे. या पाण्याचा उपयोग अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील सिंचनासाठी होणार आहे.  

उजनीतून सोडलेले पाणी रविवारी कारंबा पंप हाऊस येथे आले. रात्री टप्प्पाटप्याने ५०० अश्वशक्तीचे दोन पंप सुरू करण्यात आले. त्यातून ८० क्युसेक वेगाने पाणी हिप्परगा तलावाकडे जात आहे. हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी ७ ते १० टक्के वाढणार असून, त्याचा फायदा सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी होणार आहे.

पुढील दोन दिवसात पाणी हिप्परगा तलावात पोहोचणार आहे. दहा दिवस दोन पंप सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उजनीतून जसे पाणी उपलब्ध होईल, तसा उपसा करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश वाडकर यांनी दिली.

या पाण्याचा उपयोग अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील शेतीसाठीही होणार आहे. तलावात पाणी साठल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा होऊन उर्वरित पाणी या भागातील शेतीला दिले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com