Agriculture news in marathi Ujnit from the dam in Pune Discharge of 13 thousand 56 cusecs in to Ujni | Page 2 ||| Agrowon

पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६ क्युसेकचा विसर्ग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे उजनी धरणामध्ये शुक्रवारी (ता.७) दौंडकडून १३ हजार ५६ क्युसेक इतका सर्वाधिक विसर्ग सुरू झाला आहे.

सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे उजनी धरणामध्ये शुक्रवारी (ता.७) दौंडकडून १३ हजार ५६ क्युसेक इतका सर्वाधिक विसर्ग सुरू झाला असून, धरणाची पाणी पातळी आता १८ टक्क्यांपर्यंत पोचली आहे. पाण्याचा विसर्ग असाच कायम राहिला, तर धरण लवकरच शंभर टक्के भरणार आहे. 

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या दोन- तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. त्याचा परिणाम दौंडकडील धरणातील विसर्ग वाढण्यात झाला आहे. गेल्या वर्षी २८ जुलै रोजी मृत साठ्यातून बाहेर येऊन गेल्या वर्षी याच तारखेला उजनी धरण ८६.८४ टक्के भरले होते. तर, ६ ऑगस्ट रोजी उजनी धरणात दौंडमधून होणारी आवक ही २ लाख २१ हजार क्यूसेक इतकी होती. त्यामुळे मागील वर्षी २८ जुलै रोजी उजनी धरण मृतसाठ्यातून बाहेर आले होते. अवघ्या आठ ते दहा दिवसांत उजनी झपाट्याने भरले होते. पंरतु, यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊसमान असल्याने काहिसा उशीरा विसर्ग सुरु आहे. 

शुक्रवारी दौंडकडून १३ हजार ५६ क्युसेक इतका विसर्ग उजनीमध्ये सोडण्यात येत होता. त्यामुळे धरणाची पाणी पातळी १८ टक्क्यावर पोचली होती. हा विसर्ग असाच सुरु राहिल्यास पाणी पातळी झपाट्याने वाढ होईल, अशी शक्यता आहे. 

शुक्रवारचा धरणातील पाणीसाठा 

एकूण पाणी पातळी ४९२.३२५ मीटर
एकूण पाणीसाठा ७३.२५ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा ९.५९ टीएमसी
पाण्याची टक्केवारी १७.९१ टक्के

 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...