Onion Market Auction : खानदेशात कांदा लिलावांचा अघोषित बंद

जळगाव : खानदेशात कोरोना व इतर संकटांमुळे अनेक बाजार समित्यांमध्ये अडतदार, व्यापारी लिलावात सहभाग घेत नसल्याची स्थिती आहे. बाजार समित्यांमध्ये अघोषित बंद आहे. यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
Unannounced closure of onion auctions in Khandesh
Unannounced closure of onion auctions in Khandesh

जळगाव : खानदेशात कोरोना व इतर संकटांमुळे अनेक बाजार समित्यांमध्ये अडतदार, व्यापारी लिलावात सहभाग घेत नसल्याची स्थिती आहे. बाजार समित्यांमध्ये अघोषित बंद आहे. यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

कांदा उत्पादन गेल्या उन्हाळ्यात अनेक भागात झाले होते. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, धुळे, शिंदखेडा, जळगावमधील चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव, यावल, भुसावळ या भागात कांद्याचे चांगले उत्पादन झाले. परंतु, दर एप्रिलपासूनच कमी आहेत. शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे दोन महिने बाजार समित्यांची कार्यवाही बंदावस्थेतच होती. अमळनेर, चोपडा येथील बाजार समित्या अनेकदा बंद करण्यात आल्या. यामुळे कुठेही कांदा दर ६०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले नाहीत. सद्यःस्थितीतही दर कमी आहेत. 

दरम्यान, बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, लिलावात अडतदार सहभाग घेत नसल्याने खरेदी बंद राहत आहे. शेतकरी बाजार समितीतच कांदा सोडून घरी परत येत आहेत. आठवड्यातून दोनच दिवस कांदा लिलाव काही बाजार समित्यांमध्ये होतात. कांद्यासाठी प्रसिद्ध धुळ्यातील पिंपळनेर, साक्री येथील बाजार बंद आहे. जळगावमधील अडावद (ता.चोपडा) बाजार समितीचे कामकाजही सुरळीत नाही. कांदा चाळीतच खराब होत आहे. चाळीसगाव तालुक्यात कांदा उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे बाजार समित्या सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. 

कांद्याचे दर कमी व बाजार समित्यांचे काम विस्कळीत स्थितीत असल्याने कांदा लागवडीवरही याचा परिणाम होणार आहे. जळगाव येथील बाजार समितीत कोरोनाच्या भितीने कांदा लिलाव बंदावस्थेत आहेत. खरेदीदार अडतदारांकडून कांदा मागवून घेत आहेत. लिलाव होत नसल्याने शेतकऱ्यांना हवे तसे दर मिळत नसल्याची स्थिती आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com