एचटीबीटी कपाशी बियाणे खरेदी करु नका, कषी विभागाचे आवाहन

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाची मान्यता नसलेले एचटी बीटी कपाशीचे बियाणे खरेदी करु नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
Unapproved HTBT cotton seeds Don't buy, appeals to the Department of Agriculture
Unapproved HTBT cotton seeds Don't buy, appeals to the Department of Agriculture

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाची मान्यता नसलेले एचटी बीटी कपाशीचे बियाणे खरेदी करु नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

बाजारात बोगस कंपन्या, खासगी एजंट, खासगी व्यक्तींमार्फत परवाना नसलेली अनाधिकृत एच.टी.बी.टी.कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनाधिकृत बी. टी. बियाण्यांना काही व्यक्ती तणनाशक बी.टी , आर. आर. बी. टी., चोर बी. टी., बी .जी-३ आदी नावे दिलेली आहेत. एच.टी.बी.टी.तणनाशक बी.टी., आर.आर. बी.टी. या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही, अशा प्रकारचे बी. टी. बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. 

अनाधिकृत कापूस बियाण्याची लागवड केलेल्या पिकाच्या पानांचे नमुने व उत्पादित कापसाचे नमुने घेऊन त्यांची एच. टी. बी. टी. जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. तपासणीअंती एच. टी. बी. टी. जनुके आढळल्यास संबंधितांवर अनुषंगिक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारचे अनाधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या, खासगी एजंट, खाजगी व्यक्ती निरनिराळे आमिष दाखवून प्रलोभन देतील. त्यास बळी पडू नका. फसवणुक होऊ शकते.

शासनाची मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी. बियाणे लागवडीनंतर ग्लायफॉसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. ग्लायफॉसेट हे तणनाशक कार्सिनोजनिक गुणधर्माचे असून त्याच्या वापरामुळे कॅन्सर सारखे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होऊन भविष्यात त्या जमिनीत कोणतेही पीक लागवड करता येणार नाही. जमीन नापिक होईल. सर्व शेतकरी, शेतमजुरांचे आरोग्य धोक्यात येईल. ग्लायफॉसेट या तणनाशकाचा केवळ पिके नसलेल्या जमिनीवर, चहा मळयासाठी वापर करण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे. 

अधिकृत विक्रेत्यांकडून राज्यात परवानगी असलेले अधिसुचित बियाणेच पावतीसह खरेदी करावे. अनाधिकृतपणे प्रलोभने देणाऱ्यांविषयी तक्रार करा. त्यासाठी दूरध्वनी, ई-मेल, एस.एम.एस इत्यादीव्दारे माहिती देऊन शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण नियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. आपले नाव व पत्ता गोपनिय ठेवला जाईल.

कृषी निविष्ठांविषयी असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० किंवा जिल्हा सनियंत्रण कक्षाचे भ्रमनध्वनी ७४४८२७८९३५, ९४२१४९०२२२ वर संपर्क साधा. सतेच भ्रमणध्वनी क्रमांक ७०३८४७३९०३, ९११२४४८९२४ यावर संपर्क साधा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी केले.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com