प्रशासनाच्या आशीर्वादाने ‘साहेबां’च्या चालकास टपरी

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांचे पुनर्वसन पालकमंत्री, सहकारमंत्री आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या सूचनेनुसार केलेले आहे. गणपती मंदिरालगत वाहतुकीला अडथळा होत नसल्याने त्या ठिकाणी या टपरीचे पुनर्वसन केलेले आहे. - बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे बाजार समिती
पुणे बाजारसमितीतील अनाधिकृत टपरी
पुणे बाजारसमितीतील अनाधिकृत टपरी

पुणे  : बाजार समितीत प्रशासनाच्या आशीर्वादाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टपऱ्यांची अनधिकृत सर्रास उभारणी होत आहे. गणपती मंदिरालगत उभारण्यात आलेली टपरी ही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनाचे `सारथ्य'करणाऱ्याला ‘आप्पा’ची असल्याची माहिती टपरी चालकाकडून मिळाली आहे. तर आणखी काही टपऱ्या भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

बाजार समितीत अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामांची संख्या वाढत आहे. अतिक्रमणे प्रशासनाच्या आशीर्वादाने होत असल्याच्या तक्रारी आडत्यांनी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत टपऱ्यांची संख्या वाढत असून, गणपती मंदिरालगत काॅँक्रीटीकरण करुन टपरी थाटण्यात आली आहे. 

गेल्या आठवड्यात ही टपरी फक्त उभारण्यात आली होती. मात्र, या रविवारी (ता. १२) पान टपरीला रंगरंगोटी येथे गुटख्या (बंदी असतानाही)ची सर्रास विक्री सुरू आहे. नव्याने चार टपऱ्या भाजीपाला विभाग परिसरात उभारल्या असल्याचीही माहिती समोर येत आहे. 

प्रशासनाच्या टपऱ्यांना संरक्षण !  प्रशासकीय मंडळातील संचालकांनी आपल्या बगलबच्चांसाठी टपऱ्या उभारल्या होत्या. माध्यमांमधून या टपऱ्या प्रकाशझोतात आल्यानंतर प्रशासनाने कडक कारवाई करत जेसीबी लावून टपऱ्या उद्‌ध्वस्त केल्या. मात्र, आता प्रशासनाच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेल्या टपऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्‍न आडतदार उपस्थित करत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com