agriculture news in marathi, Uncertainty about government procurement of cotton | Agrowon

कापसाच्या शासकीय खरेदीविषयी अनिश्चितता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

सीसीआयसोबत पणन महासंघाच्या आजवर तीन बैठका झाल्या आहेत. त्यात खरेदी केंद्र सुरू करण्याविषयी कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे खरेदीविषयी अनिश्चितता आहे.

- उषा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र कापूस पणन महासंघ

नागपूर : जिनर्स आणि सीसीआयमध्ये तोडगा निघत नसल्याच्या परिणामी राज्यात शासकीय कापूस खरेदी लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कापूस पणन महासंघ हा सीसीआयचा एजंट म्हणून कापसाची खरेदी करतो, परंतु या वर्षी सीसीआयच्या खरेदीबाबत अनिश्चितता असल्याने पणन महासंघाची स्थिती अडकित्त्यात फसल्यासारखी झाली आहे.

राज्यात दिवाळीपूर्वी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाची खरेदी सुरू होते. त्याकरिता केंद्रदेखील जाहीर केली जातात. शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी, यासाठी प्रशासन स्तरावर ही काळजी घेतली जाते. या वर्षी मात्र कापूस खरेदीच्या मुद्यावर जिनर्स आणि सीसीआय यांच्यात काही मुद्यांवर एकमत होत नसल्याने खरेदी केंद्रांविषयी अनिश्चितता आहे. यंदा सीसीआयकडूनच खरेदीबाबत हालचाली नसल्याने कापूस पणन महासंघाच्या खरेदीचे घोडे अडले आहे.

शासकीय खरेदी सुुरू झाल्यास बाजारात कापूस दर तेजीत येतील, असा अंदाज जाणकार व्यक्‍त करतात. सद्या ५५०० ते ६००० रुपयांपर्यंतचा दर कापसाला आहे. त्यात आणखी वाढ होईल, अशी स्थिती आहे. मात्र गरजेपोटी शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीची घाई होत आहे. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...