महिला सक्षमीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष ः कांचन परुळेकर

महिला सक्षमीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष ः कांचन परुळेकर
महिला सक्षमीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष ः कांचन परुळेकर

औरंगाबाद : देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली. परंतु पुरुष बळ विकसनाच्या तुलनेत महिला बळ विकसनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. असं असतांना महासत्तेची स्पर्धा जिंकण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. महासत्तेची स्पर्धा एका पायाने जिंकता येत नाही. त्यासाठी महिला सक्षमीकरणाकडे विशेषत्वाने लक्ष दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत कोल्हापूर येथील ‘स्वयंसिद्‌धा’च्या संचालिका श्रीमती कांचन परुळेकर यांनी व्यक्‍त केले. एकीकडे विद्यापीठाकडून ज्ञान, तंत्रज्ञान शिकूण घेत असतानाच ज्ञानाची भूक भागविण्यासाठी ‘ॲग्रोवन’चेही नियमित वाचन करण्याचे आवाहनही श्रीमती परुळेकर यांनी केले. 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारी (ता. ३) आयोजित महिला शेतकरी मेळाव्याच्या उद्‌घाटन सत्रात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या उद्‌घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर, अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पी. जी. इंगोले, कृषिरत्न विजय बोराडे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय डॉ. एच. एल. सरंबेकर, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख दीप्ती पाटगावकर, डॉ. के. टी. जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

श्रीमती परुळेकर म्हणाल्या, की जगाला पैशाची भाषा कळत असल्यानं महिलांनी उद्योगांकडे वळून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी २७ वर्षांच्या स्वयंसिद्‌धाच्या वाटचालीत स्त्री शक्‍ती जागृतीचे काम सुरू आहे. महिला स्वयंप्रेरकांच्या माध्यमातून बाजारपेठ उभी करण्याचे काम केले आहे. उद्योगाची कास धरताना जागरूकता आणि मानसिकता ही महत्त्वाची आहे. पॅकेजिंग, सादरीकरण, योग्य किंमत, नेटवर्क उभे करण्यावर भर, देण्याचा सल्ला देऊन अनेक बचत गट, शेतकरी गट एकत्र येणं काळाची गरज आहे. विद्यापीठाने एकतरी हस्तकला प्रत्येक गावात रुजवावी. बचत गटांकडे संबंधित यंत्रणेने उद्दिष्ट म्हणून पाहू नये. त्यांच्यात आर्थिक, राजकीय साक्षरता वृद्धिंगत करण्याचे आवाहनही श्रीमती परुळेकर यांनी केले. 

जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर, कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी मार्गदर्शन केले. अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, विजय बोराडे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. पी. जी. इंगोले यांनीही आपले विचार व्यक्‍त केले. संचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्या डॉ. एच. एल सरंबेकर, तर प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी आभार मानले. मेळाव्याला जिल्हाभरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com