नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १ हजार ६५८ लाभार्थ्यांची निवड
नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत १ हजार ६५८ लाभार्थींची निवड शुक्रवारी (ता. ६) करण्यात आली.
नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत १ हजार ६५८ लाभार्थींची निवड शुक्रवारी (ता. ६) करण्यात आली.
या योजनेतंर्गत नवीन विहीर, इतर बाबींचा लाभ देण्यासाठी लाभार्थी निवड सभा शुक्रवारी (ता. ६) जिल्हा परिषदेत घेण्यात आली.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपाध्यक्ष समाधान जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, विजयकुमार बास्टेवाड, मधुकरराव राठोड, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संभाजी कऱ्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन विहीर व इतर बाबींचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या (कै.) यशवंतराव चव्हाण सभागृहात लॉटरी पध्दतीने इन कॅमेरा करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी या योजनेतंर्गत १ हजार ६५८ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत नवीनच सुरू झालेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ४८ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) अंतर्गत २५९ लाभार्थ्यांची आणि क्षेत्रांतर्गत योजनेसाठी ६४ लाभार्थ्यांची, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत किनवट व माहूर तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या ५७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षा, उपाध्यक्ष व सभापती (कृषी) यांनी बैठकीच्या वेळी सूचना दिल्याप्रमाणे शासनाच्या उद्दिष्टापेक्षा दीडपट लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामुळे पात्र प्रस्तावांपैकी एकही लाभार्थी निवडीपासून वंचित राहिलेला नाही.या सभेस योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पात्र लाभार्थी शेतकरी, पंचायत समिती स्तरावरील सर्व कृषी अधिकारी (विघयो) व विस्तार अधिकारी (कृषी) उपस्थितीत होते. जिल्हा कृषी अधिकारी (सा.) अनिल शिरफुले यांनी आभार मानले.
- 1 of 1503
- ››