agriculture news in marathi under corona fear people awaiting in front of banks for money disposal | Agrowon

‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगा

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये सर्वत्र गर्दी उसळली आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये सर्वत्र गर्दी उसळली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यात जनधन योजनेचे खाते असलेल्या महिलांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार बँक खात्याचा शेवटचा अंक ०,१,२,३ असलेल्या खात्यांतून ४ एप्रिल रोजी पैसे काढता येतील.

बँक खात्याच्या शेवटचा अंक ४ व ५ असलेल्या खात्यात ७ एप्रिल रोजी, शेवटी ६ व ७ अंक असलेल्या बँक खात्यात ८ एप्रिल रोजी आणि ज्या बँक खात्याच्या शेवटी ८ व ९ अंक आहेत, अशा बँक खात्यात ९ एप्रिल रोजी पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा झालेल्या दिवशी अथवा ९ एप्रिलनंतर केव्हाही खातेधारकाला हे पैसे काढत येतील. त्यामुळे खातेधारकांनी एकाच दिवशी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

बँक खात्याच्या शेवटच्या अंकानुसार तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार असून नागरिकांनी एकाच दिवशी बँकेमध्ये गर्दी करू नये. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेधारकांनी खात्यातील रक्कम काढण्यासाठी टपाल विभागाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सातत्याने केले जात आहे.

वाशीमला टपाल कार्यालयात पैसे काढण्याची सुविधा
कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या खातेधारकाला आपल्या खात्यातून १० हजार रुपये रक्कम काढण्याची सुविधा टपाल विभागाने कार्यालयात उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या, जनधन खाते असलेल्या महिला तसेच इतर नागरिक सुद्धा आपल्या गावातील अथवा नजीकच्या गावातील टपाल कार्यालयात जाऊन आपल्या बँक खात्यातील रक्कम काढू शकतात.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पैसे काढण्याचे वेळापत्रक
बँक खात्याचा शेवटचा अंक पैसे काढण्याची तारीख
५, ७ एप्रिल २०२०
६ व ७, ८ एप्रिल २०२०
८ व ९, ९ एप्रिल २०२०
या तारखांना पैसे न काढल्यास ९ एप्रिलनंतर केव्हाही बँक खात्यातून पैसे काढता येतील. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...