परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत १२ हजार ७३३ कामे पूर्ण

under 'Jalukti Shivar', 12 thousand 733 works have been completed In Parbhani district
under 'Jalukti Shivar', 12 thousand 733 works have been completed In Parbhani district

परभणी : जिल्ह्यातील ५८२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील चार वर्षांत १२ हजार ७३३ कामे पूर्ण झाली आहेत. आराखड्यातील ३९४ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. तर २८७ कामे अपूर्ण आहेत. या कामांवर एकूण १८५ कोटी ५० लाख ७५ हजार रुपयांचा निधी खर्च झाला.

टंचाईमुक्त महाराष्ट्रअंतर्गत तत्कालीन महायुती सरकारने राज्यात २०१५-१६ या वर्षापासून हे अभियान राबविण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती अंतर्गतच्या ८४८ गावांपैकी दरवर्षी निकषपात्र गावांची निवड करण्यात आली. चार वर्षांत निवडलेल्या एकूण ५८२ गावांच्या शिवारात जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. कृषी विभाग, वन, विभाग, सिंचन विभाग, जलसंधारण विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, ग्रामविकास विभाग आदी शासकीय यंत्रणांतर्फे लोकसहभागातून हे अभियान राबविण्यात आले.

या अंतर्गत ढाळीचे बांध, समतल सलग चर, खोल समतळ सलग चर, माती नाला बांध, अनघड दगडी बांध, पाझर तलाव, शेततळे, वनतळे, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बंधारे, भूमिगत बंधारे, कोल्हापुरी बंधारे, पुनर्भरण चर, विहीर, बोअर पुनर्भरण, शोषखड्डे, ठिबक, तुषार संच आदी कामे करण्यात आली. सक्रिय लोकसहभागामुळे अनेक गावे टंचाईमुक्त झाली. परंतु अनेक ठिकाणी उदासीनतेमुळे कामे अजूनही रखडत आहेत.  पहिल्या वर्षी २०१५-१६ मध्ये १७० गावांची अभियानात निवड झाली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावातील ग्रामस्थांचा चांगला सहभाग मिळाला. या वर्षी ४ हजार ६१० कामे पूर्ण झाली. त्यावर ८८ कोटी ८३ लाख ९ हजार रुपये निधी खर्च झाला. २०१६-१७ मध्ये १६० गावांतील कार्यारंभ आदेश दिलेल्या ४ हजार ३९० पैकी ४ हजार ३७९ कामे पूर्ण झाली. सहा कामे अपूर्ण आहेत. ५ कामांना अजून सुरुवात झाली नाही. २०१७-१८ मध्ये १२८ गावांची निवड झाली. त्यातील कार्यारंभ दिलेल्या २ हजार २३० पैकी २ हजार १९ कामे पूर्ण झाली.

अद्याप १४७ कामे अपूर्ण आहेत.  ६४ कामांची सुरुवात केली नाही. २०१८-१९ मध्ये १२४ गावांची निवड झाली. एकूण २ हजार १८४ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी १ हजार ७२५ कामे पूर्ण झाली. १३४ कामे अजून अपूर्ण आहेत. ३२५ कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com