Agriculture news in marathi Under Maharajaswa Abhiyan 22 Shiva, Shivar roads opened | Page 2 ||| Agrowon

महाराजस्व अभियानांतर्गत २२ शिव, शिवार रस्ते झाले खुले

टीम अॅग्रोवन
रविवार, 4 एप्रिल 2021

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते-शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम दिंडोरी तालुका महसूल प्रशासनाने राबवीत एकाच दिवशी २२ शिव व शिवार रस्ते खुले करण्यात आले. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

वणी, ता. दिंडोरी : अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते-शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम दिंडोरी तालुका महसूल प्रशासनाने राबवीत एकाच दिवशी २२ शिव व शिवार रस्ते खुले करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दिंडोरी तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या साहाय्याने तहसीलदार पंकज पवार यांनी कालबद्ध नियोजन करून तालुक्यातील एकूण २२ गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पाणंद पांदणा शेतरस्ते, शिवार-शिव रस्ते मोकळे केलेले आहे. या करिता नायब तहसीलदार संघमित्रा बावीस्कर, अव्वल कारकून बाहीकर आणि महसूल सहायक मोहन नांद्रे यांनी कालबद्ध कार्यक्रम तयार केला.

तालुक्यातील लोकांच्या सहभागातून आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून घेऊन तालुक्यातील संबंधित गावचे गावकरी व शेतकरी यांचे उपस्थित पंचनामा करून ताबापावती करून हे रस्ते ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. एकूण १४ कि.मी. लांबीचे २२ रस्ते खुले करण्यात आले. याचा ९२१ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ झाल्याने शेतकरी व नागरिकांनी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांचे आभार मानले. मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

प्रतिक्रिया
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे शिवरस्ते, पाणंद रस्ते लोकसहभागातून मोकळे करण्याची धडक मोहीम दिंडोरी तालुक्यात हाती घेतली आहे. महाराजस्व अभियान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचल्याचे समाधान आहे.
-पंकज पवार, तहसीलदार-दिंडोरी


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...