Agriculture news in Marathi, Understand the advantages of technology, mechanization: C. B. Lightweight | Page 2 ||| Agrowon

तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचे फायदे समजून घ्या ः डॉ. सी. बी. लटपटे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : शेतीक्षेत्रात वापरावयाचे तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचे फायदे समजून घेऊन त्याचा कार्यक्षम वापरावर भर देण्याची गरज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी व्यक्‍त केली. 

स्थानिक कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारी (ता. १२) आयोजित एकदिवसीय प्रशिक्षणात ते बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र औंरगाबाद व रेशीम संशोधन योजना, परभणी यांच्यावतीने या ‘तुती लागवडीतील यांत्रिकीकरण’ या विषयावर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

औरंगाबाद : शेतीक्षेत्रात वापरावयाचे तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचे फायदे समजून घेऊन त्याचा कार्यक्षम वापरावर भर देण्याची गरज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी व्यक्‍त केली. 

स्थानिक कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारी (ता. १२) आयोजित एकदिवसीय प्रशिक्षणात ते बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र औंरगाबाद व रेशीम संशोधन योजना, परभणी यांच्यावतीने या ‘तुती लागवडीतील यांत्रिकीकरण’ या विषयावर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, केंद्रीय रेशीम बोर्डाचे औरंगाबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. रामप्रकाश वर्मा, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ तंत्र राजू माने, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. किशोर झाडे यांची प्रशिक्षणाला प्रामुख्याने उपस्थिती होती. 

डॉ. लटपटे म्हणाले, ‘‘रेशीम उद्योगात अळ्यांच्या कात टाकण्याच्या अवस्था व तुती लागवडीतील यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यामधील तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची माहिती नसल्याने उद्योगात अपयशी होणारांची संख्याही जास्त आहे. चॉकीमुळे कोष मिळण्याची शाश्वती वाढते. इतर पारंपरिक देशात खासकरून चीनमध्ये चॉकीच्या साहाय्याने कोष उत्पादन घेण्यावर भर असल्याने त्यांच्या यशाचा आलेख आपल्यापेक्षा सरस दिसतो. रेशीम विभागाचे श्री. माने म्हणाले, ‘‘लागवड रोपाने व संगोपन चॉकीने केले तर रेशीम उद्योगात हमखास यश मिळते.’’ रेशीम विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या रेशीम उद्योगासाठीची माहितीही त्यांनी दिली. 

केंद्रीय रेशीम बोर्डाचे डॉ. वर्मा म्हणाले, ‘‘किती तुती क्षेत्रावर एक चॉकी सेंटर असावे याचे प्रमाण आहे. इतर पारंपरिक राज्यात त्या प्रमाणात चॉकी सेंटर असल्याने हा उद्योग शेतकऱ्यांना फायद्याचा ठरतो आहे. तीच स्थिती आपल्याकडे येण्यासाठी चॉकी सेंटरची संख्या किमान दोनशे एकराला एक चॉकी सेंटर या प्रमाणात ठेवण्याची गरज आहे. चॉकी सेंटर चालक व रेशीम कोष उत्पादक संतोष वाघमारे यांनीही आपले अनुभवकथन केले. किमान १८ महिने वेळ देऊन रेशीम उद्योगात सातत्य ठेवल्यास उद्योग यशस्वी होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. 

या प्रशिक्षणाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख प्रा. दिप्ती पाटगावकर, कीटकशास्त्रज्ञ प्रा. चंद्रकांत अडसूळ, प्रा. गीता यादव व डॉ. किशोर झाडे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर माहिती दिली. शेतकऱ्यांना तुतीची पाने कापणी यंत्र, कोष काढणी यंत्र, ह्युमीडीटी कम हिटर आदी यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...