agriculture news in marathi, Understand the Silk Industry for True Income: Hake | Agrowon

शास्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योग समजून घ्या : हाके
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने रेशीम उद्योगाकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग समजून घेण्याची गरज आहे, असे विभागीय रेशीम सहाय्यक संचालक दिलीप हाके यांनी सांगितले. गंगापूर तालुक्‍यातील भालगाव नारवाडी तसेच वैजापूर तालुक्‍यातील शिवूर व पोखरी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने रेशीम उद्योगाकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग समजून घेण्याची गरज आहे, असे विभागीय रेशीम सहाय्यक संचालक दिलीप हाके यांनी सांगितले. गंगापूर तालुक्‍यातील भालगाव नारवाडी तसेच वैजापूर तालुक्‍यातील शिवूर व पोखरी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

औरंगाबाद जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे ‘रेशीम शेती कशी करावी’ यासाठी या प्रशिक्षणाचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. के. सातदिवे, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी रा. सु. माने, क्षेत्र सहायक कीर्ती नागरगोजे, क्षेत्रीय अधिकारी चेतन कोल्हे, विठ्ठलराव काजगुंडे, विजयकुमार गायकवाड, मेरवान राठोड आदी या वेळी उपस्थित होते.

हाके म्हणाले, ‘‘केवळ अनुदानासाठी रेशीम उद्योग करता येत नाही. त्यासाठी रेशीमचे अनुदान मिळण्याचे स्वरूप निर्धारित करण्यात आले आहे. तुतीची योग्य पद्धतीने लागवड, शेवटपर्यंत बागेची जोपासना करणाऱ्या शेतकऱ्यालाच अनुदानचा लाभ मिळतो. उत्तम शेड, अंगमेहनत, तंत्रज्ञान, दर्जेदार तुतीपाला आणि प्रशिक्षण या बाबी रेशीम शेतीसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रोक्‍त पद्धतीने रेशीम उद्योग करून आपला आर्थिक विकास साधावा.’’

दरम्यान, शेतकऱ्यांना तुतीची लागवड पद्धत, येणारा खर्च, रोग व किडींचा होणारा प्रादुर्भाव, तुती बागेतील झाडांची संख्या, रेशीम कीटक संगोपन, पाण्याची गरज आदींची माहिती देण्यात आली.

इतर बातम्या
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...