agriculture news in marathi, Undertaking binding warranty to implement the water supply scheme | Agrowon

पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी हमीपत्र बंधनकारक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे : गावात नवीन शासकीय पाणीपुरवठा योजना राबवायची असेल, तर यापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गावात पाणीपुरवठा योजना राबवायची असेल तर तेथे राहणाऱ्या ८० टक्के लोकांचा पाणी पट्टी कर आणि नळ जोडणी घेण्याबाबत होकार असणे आवश्यक आहे. त्यांनी तसे हमीपत्र दिल्यावरच नवीन योजनेला प्रारंभ करावा, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाने दिल्या असून, काम सुरू झाल्यानंतर उर्वरित २० टक्के नागरिकांकडूनही हमीपत्र भरून घ्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे : गावात नवीन शासकीय पाणीपुरवठा योजना राबवायची असेल, तर यापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गावात पाणीपुरवठा योजना राबवायची असेल तर तेथे राहणाऱ्या ८० टक्के लोकांचा पाणी पट्टी कर आणि नळ जोडणी घेण्याबाबत होकार असणे आवश्यक आहे. त्यांनी तसे हमीपत्र दिल्यावरच नवीन योजनेला प्रारंभ करावा, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाने दिल्या असून, काम सुरू झाल्यानंतर उर्वरित २० टक्के नागरिकांकडूनही हमीपत्र भरून घ्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांवरील देखभाल दुरुस्तीचा खर्च पेलणे ग्रामपंचायतींना अवघड होत आहे. यामुळे अनेक योजना बंद पडल्याने राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने यापुढे योजना सुरू करायची असेल, तर गावातील लोकांकडून पाणीकर भरण्याबाबतचे हमीपत्र घेणे बंधनकारक केले आहे. याशिवाय नवी योजना सुरूच होणार नाही, असेही बजावले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रातील नागरिकांना वीज, पाणी, स्वच्छता या मूलभूत सोयी-सुविधा पुरवठा करण्याची प्राथमिक जबाबदारी पार पाडायची असते, यासाठी सरकारकडून निधीही उपलब्ध करून दिला जातो. मात्र वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत मिळणारा अपुरा निधी यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मर्यादा आल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने सहा ऑगस्ट रोजी गावपातळीवरील पाणी योजनांबाबत वरील आदेश जारी केले आहेत.

सद्यःस्थितीत एखाद्या गावात शासकीय पाणीपुरवठा योजना राबवायची असेल तर प्रकल्प अहवाल तयार करण्यापूर्वी पाणीपट्टी (पाणीकर) भरण्यास तयार असल्याबाबत संबंधित ग्रामपांचायतीकडून ठराव मागवण्यात येतो. मात्र याची कल्पना गावकऱ्यांना नसते. त्यामुळे योजना सुरू झाल्यावर नागरिकांकडून नळजोडणी व मीटरजोडणीला प्रतिसाद मिळत नाही. तसेच जोडणी घेणाऱ्यांकडूनही नंतर पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ केली जाते.

सरकारचा खर्च वाया जाणार नाही
योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवणे ग्रामपंचायतीला जड जाते व कालांतराने ही योजनाच बंद पडते. यामुळे गावकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही आणि योजनेवरील सरकारचा खर्चही वाया जातो. ही बाब टाळण्यासाठी आता योजना सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक घरमालकांकडून पाणीपट्टी आणि नळजोडणीबाबत वैयक्तिक हमीपत्र घ्यावे लागणार आहे, अशी माहिती भूजल विभागाच्या सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...