Agriculture news in Marathi Undo the disconnected power connection of the agricultural pump | Page 4 ||| Agrowon

कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्याची दखल घेत महावितरणने कनेक्शन पूर्ववत करीत असल्याचे लेखी पत्र कार्यकर्त्यांना दिले. आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाणार होते. तत्पूर्वीच हे पत्र देण्यात आले.

बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन जोडण्याबाबत मंगळवारी (ता. ३०) भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्याची दखल घेत महावितरणने कनेक्शन पूर्ववत करीत असल्याचे लेखी पत्र कार्यकर्त्यांना दिले. आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाणार होते. तत्पूर्वीच हे पत्र देण्यात आले.

जळगाव जामोद उपविभागात सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वीजबिल वसुलीसाठी वीजकनेक्शन कापले जात आहेत. रोहित्र बंद ठेवण्यात येत असल्याने रब्बी पिके संकटात सापडली होती. या मुद्यावर भाजपच्या वतीने २५ नोव्हेंबरला निवेदन देत मंगळवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन पाहता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत चर्चा करून तातडीने तोडगा काढला. 

कृषिपंपाचे तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्यात येत आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता कृषिपंपाची वसुली थांबविण्यात येत आहे. जळालेले रोहित्र बदलून देण्यासाठी किमान चालू देयके भरावे, तसेच कृषिपंपाच्या बिल वसुलीसाठी तूर्तास रोहित्रे बंद करणे थांबविण्यात येत आहे, असे लेखी पत्र उपकार्यकारी अभियंत्यांनी दिले.


इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...