ग्रामपंचायतींच्या तोडलेल्या वीज जोडण्या पूर्ववत

खानदेशात वीजबिल थकबाकीमुळे अनेक ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोतांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. या संदर्भात काही ग्रामपंचायतींनी थकबाकी काही दिवसांत भरण्याची मुदत मागून घेतली आहे.
ग्रामपंचायतींच्या तोडलेल्या वीज जोडण्या पूर्ववत Undo the disconnected power connections of the Gram Panchayat
ग्रामपंचायतींच्या तोडलेल्या वीज जोडण्या पूर्ववत Undo the disconnected power connections of the Gram Panchayat

जळगाव : खानदेशात वीजबिल थकबाकीमुळे अनेक ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोतांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. या संदर्भात काही ग्रामपंचायतींनी थकबाकी काही दिवसांत भरण्याची मुदत मागून घेतली आहे. यानंतर हे वीज जोडण्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. 

खानदेशात २२०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती, पाडे आहेत. यातील ८० टक्के ग्रामपंचायतींचे वीजबिल थकले आहे. त्यात सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोत किंवा विहिरी, कूपनलिकांचे वीजबिल अधिक आहे. काही मोठ्या ग्रामपंचायतींची थकबाकी दोन ते अडीच कोटी रुपये आहे. तर अनेक ग्रामपंचायतींची थकबाकी ५० ते ६० लाख रुपये आहे. वीज वितरण कंपनीने गेल्या पंधरवड्यात थकबाकीदार ग्रामपंचायतींचे वीज जोडण्या कापण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावोगावी पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यानंतर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. वीजबिलासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा, कारण पाणीपट्टी ग्रामस्थ पीक नुकसान, वित्तीय अडचणीमुळे सध्या भरू शकत नाहीत.

कोरोना काळात वीजबिल सूट करावे, वीजबिलातील कमाल रक्कम माफ करावी आदी मुद्दे उपस्थित केले. या नंतर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांकडे हा विषय सोपविण्यात आला. अधिकाऱ्यांनी देखील तातडीने काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा केली आणि वीज वितरण  कंपनीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर ग्रामपंचातींच्या वीज जोडण्या पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. परंतु अनेक ग्रामपंचायतींनी या कालावधीत थकबाकीमधील दहा ते पाच टक्के निधीही भरला आहे. हा निधी किंवा थकबाकी भरण्यासाठी वित्त आयोगाचा निधी वापरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी देखील ग्रामपंचायतींनी शासन, जिल्हा परिषदेकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com