agriculture news in marathi Undo the functioning of market committees in Khandesh | Agrowon

खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

जळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत झाले आहे. परंतु शेतमालाचे दर मात्र दबावातच आहेत.

जळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत झाले आहे. परंतु शेतमालाचे दर मात्र दबावातच आहेत. मध्यंतरी कोविड व बाजारपेठ हवी तशी कार्यरत नव्हते. त्यामुळे शेतमालास दर मिळत नसल्याची बतावणी केली जात होती. परंतु अद्यापही बाजरी, गहू, ज्वारी, मका दरात सुधारणा दिसत नसल्याची स्थिती आहे. 

मक्याची आवक अत्यल्प आहे. त्याचे उत्पादन हवे तसे खानदेशात झालेले नाही. पण मक्याचे दर एप्रिलमध्ये १२५० ते १४००, मे महिन्यात १३०० ते १५५० आणि जूनमध्ये १४०० ते १६५० ते १७८० रुपये प्रतिक्विंटल आहेत. गव्हाचे दरही मार्चपासून १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. ज्वारीचे दर नीचांकी स्थितीत म्हणजेच १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. बाजरीचे दरही १५०० ते १६५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. 

भुईमूग शेंगांचे दरही मध्यंतरी घसरले होते. किमान दर ३४०० रुपये प्रतिक्विंटल (वाळविलेल्या शेंगा) असे होते. यंदा भुईमुगाच्या शेंगांनाही नीचांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. कोविडमुळे अडतदार मार्च, एप्रिलमध्ये लिलावात सहभागी होत नव्हते. मे मध्येदेखील बाजार समित्यांचे कामकाज हवे तसे गतिमान नव्हते. परंतु मेच्या अखेरीस कामकाज पूर्ववत झाले. तरीदेखील शेतमालाच्या दरात सुधारणा झालेली नाही. सर्वच शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

शेतीमालाला हमीभाव मिळावा

प्रशासन कोविडचे कारण सांगून बाजार समितीत गर्दी टाळा असे सांगते. पण शेतमालाचे दर कमी आहेत, हमीभाव कुणालाही मिळत नाही, याबाबत प्रशासन कारवाई करीत नाही. या बाबतही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...