खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

सोनगीर, जि. धुळे: खानदेशातील लाखाहून अधिक लहान- मोठे व्यावसायिक आहेत. यंदा हिवाळ्यातील सर्व यात्रा कोरोना सावटामुळे रद्द झाल्या. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. अनेकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.
Unemployment ax on many due to lack of yatras in Khandesh
Unemployment ax on many due to lack of yatras in Khandesh

सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता आठ महिने लहान- मोठ्या यात्रा भरतात. कार्तिकी एकादशीनंतर प्रमुख यात्रांना सुरवात होते.   केवळ यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेले खानदेशातील लाखाहून अधिक लहान- मोठे व्यावसायिक आहेत. यंदा हिवाळ्यातील सर्व यात्रा कोरोना सावटामुळे रद्द झाल्या. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. अनेकांवर  बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. 

खानदेशच नव्हे, तर राज्याच्या अर्थकारणावर यात्रांचा मोठा प्रभाव आहे. यात्रा म्हणजे एक पर्वणीच असून, समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. गुढीपाडव्यानंतर उन्हाळी विशेषतः देवींच्या यात्रा सुरू होतील, की नाही शंकाच आहे. खानदेशात विखरण, सारंगखेडा, आमळी, बोरीस, मंदाणे, शिरपूर, मुडावद, बहादरपूर, अमळनेर, धुळे, चोरवड, वायपूर आदी ठिकाणच्या यात्रा प्रसिद्ध आहेत.

शिवाय, नवरात्र व चैत्र महिन्यातील नवरात्रात देवींच्या यात्रा भरतात. खानदेशात एकवीरादेवी, पेडकाईदेवी, मनुदेवी, बिजासनी देवी, धनदाई देवी, इंदाशी देवी, धनाई- पुनाई देवी, आशापुरी देवी, भटाई देवी आदी देवींच्या यात्राही प्रसिद्ध आहेत.

लाखाहून अधिक व्यावसायिक केवळ यात्रांवर पोट भरतात. त्यांचा अन्यत्र कुठेही स्थिर व्यवसाय नाही. त्यात सर्व प्रकारचे पाळणे, ‘मौत का कुवा’ सारखे विविध करमणुकीची साधने, काही लोकनाट्य तमाशा मंडळे, गोंदणकला, लहान- मोठे गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, उपाहारगृहे चालकही केवळ यात्रेतच व्यवसाय करतात. केवळ एका यात्रेपुरता व्यवसाय करणारेही अनेक आहेत.

प्रगतीलाही खीळ

खानदेशात सुमारे ५० मोठ्या यात्रा भरतात. त्यातून उलाढाल होऊन प्रगतीला मोठा हातभार लागतो. यात्रा भरणाऱ्या गावांना लाखो रुपये महसूल व तरुणांना रोजगार मिळतो. त्यातून त्या गावाचाही विकास होतो. यात्रेतील भाविकांच्या देणगीतून भव्य मंदिर, रोषणाई, रस्ते, पिण्याचे पाणी, निवास व जेवण व्यवस्था, स्वच्छतागृह, शौचालय आदी सुविधा झाल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com