टाळेबंदीमुळे पैठणी उद्योगावर बेरोजगारीचे संकट 

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने गेल्या महिन्यापासून येवल्यात जगप्रसिद्ध पैठणीची विक्री थांबली. त्यामुळे दररोज दीड कोटींहून अधिक होणारी उलाढाल ठप्प झाल्याने चालू महिन्यात ५० कोटींच्यावर आर्थिक नुकसान झाल्याचा दावा व्यावसायिक करत आहेत. प्रामुख्याने याचा परिणाम पैठणी उत्पादन व याच्याशी संलग्न असणाऱ्या घटकांवर झाला असून पैठणी उद्योगावर बेरोजगारीचे संकट कोसळल्याचे भीषण चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Unemployment crisis in Paithani industry due to lockout
Unemployment crisis in Paithani industry due to lockout

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने गेल्या महिन्यापासून येवल्यात जगप्रसिद्ध पैठणीची विक्री थांबली. त्यामुळे दररोज दीड कोटींहून अधिक होणारी उलाढाल ठप्प झाल्याने चालू महिन्यात ५० कोटींच्यावर आर्थिक नुकसान झाल्याचा दावा व्यावसायिक करत आहेत. प्रामुख्याने याचा परिणाम पैठणी उत्पादन व याच्याशी संलग्न असणाऱ्या घटकांवर झाला असून पैठणी उद्योगावर बेरोजगारीचे संकट कोसळल्याचे भीषण चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

येवल्यात मुख्य रोजगार पैठणी व्यवसायावर अवलंबून आहे. इतर व्यावसायिक संधी नसल्याने शहर व परिसरात पैठणी उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. आजमितीला व्यवसायाशी २० हजारांवर घटकांचा रोजगार अवलंबून असल्याचे जाणकार सांगतात. अनेकांचे प्रपंच यावरच अवलंबून आहेत. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पैठणी उत्पादन व विक्री व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक कोंडीचे संकट व्यवसायावर ओढवले आहे. 

भांडवलाची गुंतवणूक करून उत्पादकांनी पैठणी तयार केल्या. मात्र, संपूर्ण विक्री बंद असल्याने लग्नसराईचा विक्री हंगाम वाया गेल्याने खेळते भांडवल संपुष्टात आले. यामुळे पुढे नेमके काय होईल या विवंचनेत सर्वजण आहेत. पैठणी उत्पादनाशी संबंधित घटकांचा व्यवहार दर आठवड्याला फिरत असतो. विणकर, कारागीर यांच्या हाती आठवडे बाजाराच्या दिवशी येणारा ताजा पैसा येत नसल्याने अनेकांना प्रपंच चालवणे सध्याच्या या अडचणीच्या काळात अडचणीचे झाले आहे. 

पैठणी उत्पादनात संबंधित घटकांवर उपासमारीची वेळ  पैठणी उत्पादन प्रक्रियेत रेशीम रंगारी, रेशीम उकलणारे, पैठणीसाठी रेशीम सांधणारे, खास नक्षी कारागीर व हातमाग दुरुस्त करणारे असे विविध घटक सध्या अडचणीत आहेत. विणकरांना शासकीय सुविधा मिळतात. मात्र, इतर घटक असंघटित असल्याने त्यांची कुठेही दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमार होत असल्याची माहिती येवला पैठणी क्लस्टरचे संचालक व रंगारी व्यावसायिक सुनील भावसार यांनी दिली. 

पैठणी व्यवसायाचे स्वरूप 

  1. येवला शहर व परिसरात ५००० हुन अधिक हातमाग 
  2. १०० च्यावर विक्री दालने 
  3. पैठणी उत्पादनासाठी संबंधित व्यवसायाशी २० हजार घटक अवलंबून 

प्रमुख अडचणी 

  • कच्चा माल रेशीम हे बेंगलोर व जर सूरत येथून वाहतूक होत असते मात्र, सध्या कच्च्या मालाची उपलब्धता नाही. 
  • टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याने तयार झालेला मालाची विक्री होत नसल्याने तयार पैठण्यांना उठाव नाही. 
  • तयार पैठण्यांची विक्रेत्यांकडून कमी दराने मागणी 
  • गुंतवलेले भांडवल वसूल करण्याची चिंता 
  • व्यवहार होत नसल्याने खेळत्या भांडवलाचा प्रश्न 
  • ग्राहक नसल्याने महिन्यापासून विक्री मंदावली 
  • घरगुती उत्पादन सुरू मात्र कच्च्या मालाच्या उपलब्धतेत अडचणी 
  • विक्रेत्यांकडून मालाला उठाव नाही. त्यात थोडे फार उपलब्ध भांडवल गुंतवून घरगुती उत्पादन घेतले तरी माल अंगावर पडणार आहे. त्यात कच्च्या मालाचीची मोठी अडचण झाली आहे.  - मनोज भागवत, पैठणी उत्पादक, येवला, जि. नाशिक 

    लग्न सराईच्या हंगामात मोठी गुंतवणूक करून माल भरला. मात्र, ग्राहक कमी झाल्याने व आता विक्री बंद असल्याने हा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे जे काही भविष्य ठरेल ते दिवाळीवर अवलंबून आहे. व्यवसायात मोठी कसरत करावी लागणार आहे.  - एक पैठणी विक्रेता, येवला. 

    अडचणीच्या काळात पैठणी तयार केल्या. मात्र, विक्रेत्यांकडून खरेदी सुरू नाही. त्यात काहीजण कमी दरात मागणी करत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके पुढे काय करावे हा प्रश्न आहे.  - सागर कुऱ्हाडे, पैठणी विणकर, येवला, जि. नाशिक 

    पैठणीला मागणी नसल्याने काही उत्पादकांनी उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कारागिरांवर रोजगाराचे संकट कोसळले आहे. अनेकजणांचे प्रपंच पैठणी व्यवसायावर अवलंबून असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. माल तयार पण कोणीही विचारणा करत नाही.  - शिरीष पेटकर, पैठणी उत्पादक, येवला, जि. नाशिक   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com