जिल्हा बॅंकेच्या कारभाऱ्यांमधील बेबनावाने अस्वस्थता

जिल्हा बॅंकेच्या कारभाऱ्यांमधील बेबनावाने अस्वस्थता
जिल्हा बॅंकेच्या कारभाऱ्यांमधील बेबनावाने अस्वस्थता

सांगली ः सांगली जिल्हा बॅंक ही जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खरा आर्थिक आधार आहे. त्यातून या बॅंकेचे स्थान आणि महत्त्व अधोरेखित होते. पण, ही बॅंक सध्या कारभाऱ्यांमधील बेबनावामुळे अस्वस्थ आहे. वर्ष-सहा महिन्यांपासून बॅंकेत मोठी अस्वस्थता आहे. अध्यक्षांचे जुन्या संचालकांशी उडत असलेले खटके, रखडलेली नोकरभरती, वसंतदादा कारखान्याचा भाडेकरार व अन्य काही कारणे संचालकांच्या बंडामागे आहे. जिल्हा बॅंक वर्तुळात तशी चर्चा जोरात आहे.

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी, काॅँग्रेसमधील एक गट आणि भाजप अशी तिरंगी सत्ता आहे. दिलीप पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्याने प्रथमच बॅंकेत संचालक म्हणून एंट्री केली होती. अध्यक्षपद राष्ट्रवादीला आणि उपाध्यक्षपद भाजपला हे निश्‍चित होते. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून जुने संचालक प्रबळ इच्छुक होते. मात्र, दिलीप पाटील यांनी बाजी मारली.  १५७ कोटी रुपये नुकसानीच्या प्रकरणामुळे जुन्या संचालकांना बॅकफूटवर जावे लागले. मात्र हा वाद अध्यक्षपदाच्या निवडीपुरता राहिला नाही. दिलीप पाटील यांचे जुन्या संचालकांशी खटके उडत राहिले. राष्ट्रवादी संचालकांमधील नवा-जुना हा विसंवाद कायम राहिला.

बॅंकेत कर्मचाऱ्यांची भरती रखडली बॅंकेत कर्मचाऱ्यांची ५१७ पदे रिक्त आहेत. ही भरती रखडली आहे. तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही २८ पदांवरील भरती रखडली आहे. दीड-दोन वर्षे भरतीची नुसतीच चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र काही घडत नाही. कर्मचारी भरतीत अडकलेले हितसंबंध सर्वश्रुत आहेत. त्याची चर्चा बॅंकेत आणि बॅंकेबाहेर जोरात आहे.

पाठपुरावा गरजेचा असताना खडाजंगी वसंतदादा कारखाना सिक्‍युरिटायझेशन ॲक्‍टअंतर्गत जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतल्यानंतर काहींना वाटले की कारखान्याचा आता लिलाव होणार! पण तो भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला. भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यावरून काहींच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र भाडे करार झाला. कारखाना सुरू होतोय, शेतकरी, कामगारांची देणी भागविली जात आहेत, म्हटल्यावर या करारात काय काय तरतुदी आहेत हे कुणी गांभीर्याने घेतले नाही. खरे तर कराराचा कसून अभ्यास करणे हे संचालक मंडळाचे काम होते. पण, मागणी करूनही करार उपलब्ध होऊ शकला नाही असा काहीचा आरोप आहे. करार दुरुस्तीसाठी एकत्रित पाठपुरावा गरजेचा असताना खडाजंगी होत राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com