सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर परिसरातील ग्रामस्थांमध्ये संताप

माळीनगर, जि. सोलापूर: वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे माळीनगर भागातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. माळीनगर वीज केंद्रातून गेल्या महिनाभरात प्रत्येक दिवशी गायब झालेल्या विजेचे ऑडिट करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.
With uninterrupted power supply Anger among villagers in Malinagar area
With uninterrupted power supply Anger among villagers in Malinagar area

माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे माळीनगर भागातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. माळीनगर वीज केंद्रातून गेल्या महिनाभरात प्रत्येक दिवशी गायब झालेल्या विजेचे ऑडिट करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. 

गेल्या महिनाभरापासून माळीनगरसह गट नंबर दोन, सवत गव्हाण, बिजवडी भागात वेळी-अवेळी वीज गायब होत आहे. पाऊस, वादळ, वारा असला किंवा नसला तरीही माळीनगर केंद्रातून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे पिण्याचे पाणी, दळण दळणे यांसारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा दुरुस्तीच्या कामासाठी दिवसभर वीजपुरवठा खंडित होऊनही पुन्हा रात्री वीज गायब होते.

परिणामी, नागरिकांना अनेकदा विजेअभावी रात्र अंधारात काढावी लागते. त्यामुळे वीज वितरणने दिवसभर केलेल्या कामांबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पिण्याच्या पाण्यासाठी घरी सब मर्सिबल पंप असूनही वीज नसल्याने त्याचा वापर करता येत नाही. वीज केंद्रांत होणारे घोटाळे, वीजवाहक तारांना झाडांचे असलेले अडथळे, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, यामुळे वीजपुरवठा सातत्याने बंद राहात आहे. लॉकडाउनमध्ये जवळपास तीन महिने अत्यावश्‍यक सेवा वगळता अनेक व्यवसाय बंद होते. लॉकडाउन शिथिल झाल्यावर व्यवसाय हळूहळू सुरू होऊन गावगाडा पूर्वपदावर येऊ लागला आहे. मात्र, त्यास वीजेचे ग्रहण लागल्याने व्यापारी चिंतेत आहेत. 

शेतीत ठिबक सिंचनद्वारे पाणी, खते, औषधे पिकांना देणे विजेअभावी शेतकऱ्यांना कठीण जात आहे. विजेसंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, माळीनगर केंद्रातील अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माळीनगर केंद्रातून सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com