agriculture news in marathi Union Cabinet extends repayment for agriculture short-term loans up to August 31 | Agrowon

अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी आणि संलग्न बँक कर्जफेडीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 

नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी आणि संलग्न बँक कर्जफेडीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 

एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीनंतर सोमवारी (ता.१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यानंतर परिवहन मंत्री नितीन गडकरी,  माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची घोषणा केली केली. 

देशात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिकस्थितीनंतर कृषी क्षेत्राला केंद्र सरकारने काहीअंशी दिलासा दिला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय सध्या थकीत झालेले किंवा १ मार्च २०२० आणि ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान थकीत असलेल्या सर्व अल्पमुदतीच्या कृषी कर्जास लागू असेल. तसेच या कर्जास दोन टक्के व्याज हस्तक्षेप योजना आणि वेळेत कर्जफेड तीन टक्के व्याज सवलत योजनाही लागू असेल. 

या मुदतवाढीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कोणताही दंड न भरता वार्षिक चार टक्क्यांनी फर्जफेड करणे किंवा नूतनीकरण करण्यास मदत होणार आहे. शिवाय कोरोनाच्या काळात कर्ज नूतनीकरणासाठी बँकेकरिताचा प्रवास करण्याची गरज पडणार नाही. 

केंद्र सरकार बँकांच्या माध्यमातून अल्पमुदतीचे कृषी कर्ज दोन टक्के वार्षिक व्याज हस्तक्षेप योजनेअंतर्गत आणि वेळेत कर्जफेड तीन टक्के व्याज सवलत योजना लागू करते. यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक चार टक्के व्याजावर हे तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. 

कृषी कर्जफेडीसाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. कृषी कर्जावरील बॅंकांचा व्याजदर नऊ टक्के असला तरी केंद्र सरकारतर्फे त्यावर अल्पकालीन कृषी कर्जावर दोन टक्के व्याजदराची सवलत आणि वेळेवर परतफेड केल्यास व्याजदरात तीन टक्के सवलत दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना फक्त चार टक्केच व्याजाने कर्ज मिळत असल्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले. सोमवार अखेरपर्यंत केंद्राने ३६० लाख टन गव्हाची तर ९५ लाख टन धाना(भात)ची खरेदी केली असल्याचेही ते म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...