Agriculture news in Marathi, Union Joint Secretary Taishhetti interact with farmers | Agrowon

केंद्रीय सहसचिव तायशेटे यांचा शेतकऱ्यांशी संवाद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

पुणे : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासंदर्भात केंद्रीय सहसचिव सुषमा तायशेटे यांनी शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची व कान्हूर मेसाई येथे गावशिवारातील कामांची पाहणी करून ग्रामस्थ, शेतकरी, महिला, युवक यांच्यासह चारा छावणीतील पशुपालकांशीही संवाद साधला.

पुणे : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासंदर्भात केंद्रीय सहसचिव सुषमा तायशेटे यांनी शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची व कान्हूर मेसाई येथे गावशिवारातील कामांची पाहणी करून ग्रामस्थ, शेतकरी, महिला, युवक यांच्यासह चारा छावणीतील पशुपालकांशीही संवाद साधला.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपविभागीय प्रांतधिकारी भाऊसाहेब गलांडे, शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी जठार, वन विभागाचे अधिकारी पालवे आदी या वेळी उपस्थित होते. सहसचिव तायशेटे चिंचोली (मोराची) येथील गाव तलावाची पाहणी करून तलावाची साठवण क्षमता, देखभाल, दुरुस्ती व गावातील जलसंवर्धनाच्या कामाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. गावची लोकसंख्या त्यानुसार पाण्याची गरज, पीकपद्धती, भूजलस्थिती जाणून घेत गावाला जलस्वयंपूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतही ग्रामस्थांशी चर्चा केली. सरपंच रूपाली धुमाळ यांनी गावच्या जलस्थितीबाबत माहिती दिली.

कान्हूर मेसाई येथे वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचीही सहसचिव तायशेटे यांनी पाहणी केली. वनपाल श्रीमती सी. ए. काटे यांनी वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भातील नियोजनबाबत सविस्तर माहिती दिली. सिमेंट नालाबांधची पाहणी करून शेतीत काम करत असलेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत गावातील जलस्थितीबाबत विस्ताराने जाणून घेतले. कान्हूर गावालगत असलेल्या चारा छावणीची पाहणी करून पशूपालक शेतकऱ्यांशीही चर्चा केली. सरपंच दादा खर्डे यांनी गावच्या भूजलस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...