Agriculture news in marathi; United Nations Development Program Surveillance of the team in flooded areas | Page 2 ||| Agrowon

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची पूरग्रस्त भागात पाहणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी (ता. १८) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने केली. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या पिकांबरोबर नुकसान झालेल्या अन्य घटकांबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.

कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी (ता. १८) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने केली. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या पिकांबरोबर नुकसान झालेल्या अन्य घटकांबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.

सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूर शहर, इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड, राजापूर, आणि खिद्रापूर या गावांना भेटी देण्यात आल्या. शेती, पडलेली घरे आदिंसह नुकसान झालेल्या बाबींची पाहणी करण्यात आली. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महापूर काळातील परिस्थितीची माहिती देऊन पिकांचे झालेले नुकसान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. घरे पडलेले नागरिक, नुकसान झालेले उद्योजक यांच्याशी बोलत नुकसानीच्या तीव्रतेची माहिती घेतली. अनेक नागरिकांनी उपजीविकाच करणे अशक्‍य झाल्याचे सांगत भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली.जिल्ह्यातील ३४५ गावे या महापुरात बाधित झाली. यामध्ये ९५४२ पूर्णत: घरांचे तर ३१४९२, अंशत: घरांचे नुकसान झाले आहे. ४२२१ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे ७८१०२ हेक्‍टर पिकांचे, तसेच ३३७ हेक्‍टर जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २८२ रस्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली. 

कृष्णा, भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पुराचे जादा वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त तालुक्‍यांना पोचविण्याचे नियोजित आहे. भविष्यामध्ये असा महापूर आल्यास त्यासाठी उपाय योजना म्हणून रस्त्यांची उंची वाढविणे, आवश्‍यक त्याठिकाणी उड्डाण पूल बांधणे, आवश्‍यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करणे, महावितरणचे उपकेंद्र उंच ठिकाणावर बसविणे, विजेच्या खांबांची उंची वाढविणे अशा नियोजित कार्यक्रमाबाबत चर्चा केली.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महापुरामुळे नुकसान झाले. शेतीबरोबर लघुउद्योगही बुडाले. अशा नागरिकांना उभारा देण्यासाठी तातडीने काय करता येईल याचा अंदाज शिष्टमंडळातील सदस्यांनी घेतला. सदस्यांनी पूरग्रस्त विविध घटकांशी संवाद साधला. याबाबतचा अहवाल तयार करून मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले.
पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण तज्ज्ञ पी. के. दास, उपजीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर आणि अविनाश कुमार यांचा या पथकात समावेश होता. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर लगतच्या चिखली आंबेवाडी भागाची पहाणी करून ग्रामस्थांशी संवाद सांधला.

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...