महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

पर्यावरणपूरक जीवनप्रणालीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात महूदसारख्या गावातून आधीपासूनच झाली आहे. समग्र ग्रामविकासासाठी गावकऱ्यांनी दिलेला लोकसहभाग आणि केलेली एकजूट महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
The unity of the Mahud villagers is admirable
The unity of the Mahud villagers is admirable

सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी पर्यावरणपूरक जीवनप्रणालीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात महूदसारख्या गावातून आधीपासूनच झाली आहे. समग्र ग्रामविकासासाठी गावकऱ्यांनी दिलेला लोकसहभाग आणि केलेली एकजूट महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. गावाच्या परिसरात अधिकाधिक तुळशीची रोपे लावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 

नॅशनल वाॅटर अवॅार्ड विजेत्या महूद बुद्रूक (ता. सांगोला) येथे आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपणाने माझी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच संजीवनी लुबाळ, मराठी चित्रपट नाट्य अभिनेते चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री ऋतुजा बागवे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाजिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, यशदाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी सुमंत पांडे, अग्रणी नदी पुनरुज्जीवनचे समन्वयक नरेंद्र चुग, नमामि गोदा फाउंडेशनचे प्रमुख राजेश पंडित, आदिनाथ ढाकणे, उपसरपंच महादेव येळे आदी उपस्थित होते.

डॉ. सिंह म्हणाले, की ग्रामस्तरावरील कोणत्याही कामाला लोकसहभागाशिवाय पूर्णत्व नाही. कासाळगंगा ओढ्याच्या कामातून ते महुदकरांनी दाखवून दिले आहे. यापुढेही हे काम अविरत सुरुच ठेवा. त्यासाठी आवश्यक ती साह्य आपण देऊ. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावण्यासोबत माझी वसुंधरा अभियान यशस्वी होण्यासाठी महूदकरांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. याशिवाय आरोग्य रक्षण, करिअर मार्गदर्शन याविषयी महूद ग्रामस्थांना मदत केली जाईल, असे सांगितले.

अभिनेते चिन्मय, ऋतुजा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर महूद बुद्रूक गावाच्या समग्र ग्रामविकासासाठी कासाळगंगा फाउंडेशनचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे असतील, अशी घोषणा यावेळी डॉ. सिंह यांनी केली. त्याला स्वतः चिन्मय आणि ऋतुजा यांनीही सहमती देत, यापुढे आमच्यासाठी ही मोठी संधी आहे. आमचा गौरव आहे, आम्ही या कामासाठी साह्य करुच, पण महाराष्ट्रभर हे काम पोहचवू, असे आश्वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com