वऱ्हाडात सार्वत्रिक बरसला पाऊस

वऱ्हाडात सार्वत्रिक बरसला पाऊस

अकोला  ः वऱ्हाडातील काही तालुक्यांमध्ये बुधवारी (ता. २५) पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. या पावसाने बुलडाणा जिल्ह्यात काही भागांत दाणादाण उडवून दिली. पैनगंगा नदीला पूर वाहल्याने काठावरील गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे बुलडाण्याहून चिखली, अजिंठा, औरंगाबाद जाणारे मार्ग बंद झाले होते.   बुधवारी दिवसभर ठिकठिकाणी पाऊस पडत होता. सायंकाळी बुलडाणा तालुक्यात पावसाचा जोर वाढला. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यात अतिजोराने पाऊस पडल्याने काहीवेळात सर्वत्र पाणी झाले. बुलडाण्यातील पाडळी मंडळात ७३ मिलिमीटर, म्हसला ५३, साखली ५६, देऊळघाट ६३ मिलिमीटर पाऊस झाला. याशिवाय जिल्ह्यातील सर्वच मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे बुलडाणा तालुक्यात सर्वच नद्यांना पूर वाहले. पैनगंगा नदीला मोठा पूर गेला.        वऱ्हाडातील तालुकानिहाय पाऊस अकोला २९.३० मिलिमीटर, बार्शीटाकळी २४.३०, अकोट १७.३०, तेल्हारा ३०.६०, बाळापूर १९.२०, पातूर१४.२०, मूर्तिजापूर २९.५०,  वाशीम २.१७, मालेगाव १७.२५, रिसोड ३.५, मंगरुळपीर १२.८२, मानोरा ५.९६, कारंजा ६.९१, बुलडाणा ५५.४, चिखली २३.९, देऊळगावराजा ७, सिंदखेडराजा ३०.१, लोणार ३०.४, मेहकर २७.३, खामगाव ३६.२, शेगाव १८.४, मलकापूर २६.३, नांदुरा २१.९,  मोताळा १८.६, संग्रामपूर ३९.४, जळगाव जामोद ११.१ मिलिमीटर

पाच मध्यमप्रकल्प ओव्हरफ्लो गेल्या काही दिवसांतील सलग पावसामुळे प्रकल्पांमधील साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मध्यम प्रकल्पांची तहान भागली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मस, ज्ञानगंगा, पलढग, तोरणा, उतावळी हे पाच प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. प्रत्येक प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. इतर प्रकल्पांची स्थितीही गेल्या काही वर्षांत प्रथमच सुधारलेली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com