शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ तत्पर ः मानकर

शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ तत्पर ः मानकर
शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ तत्पर ः मानकर

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आजवर सर्वाधिक संख्येने असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तंत्रज्ञान, वाण विकसित केले. या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांच्यापर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोचविण्यास विद्यापीठ तत्पर आहे, असे मत या विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी व्यक्त केले. 

बार्शीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथे गुलाबी बोंडअळी जनजागृतीसाठी आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि यूपीएल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात मागील दोन हंगामांपासून बोंडअळी नियंत्रणासाठी उपक्रम राबविला जात आहे. गावे दत्तक घेऊन त्या शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, निविष्ठा पुरविल्या जात आहेत. यावर्षी निवडलेल्या पाटखेड येथे कपाशीची पाहणी व शेतकरी संवादाचा कार्यक्रम बुधवारी (ता. ४) आयोजित करण्यात आला होता. या वेळी कंपनीचे स्पेशल प्रोग्राम व्यवस्थापक प्रताप रणखांब, नवीन सोनी, बार्शीटाकळी पंचायत समिती कृषी अधिकारी संजय चांदूरकर, सरपंच महादेव मानकर, शेतकरी जगन्नाथ कुचर, तेजराव काटे, पुरुषोत्तम गोसामे, संदीप तराळे, संदीप ढोरे व्यासपिठावर उपस्थित होते.

डॉ. मानकर म्हणाले, राज्यात ३८ लाख हेक्टरवर कपाशीचे उत्पादन घेतले जाते. त्यात १४ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भाचे आहे. कापूस हे आपल्या भागाचे प्रमुख पीक असून विद्यापीठाने याची दखल घेत कपाशीचे बीटी वाण आणले. दोन वर्षांपूर्वी गुलाबी बोंडअळीचे मोठे संकट अचानक आले. मात्र, विद्यापीठाने कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यालयातील विद्यार्थी, खासगी कंपन्या अशा सर्वांच्या सहकार्याने जनजागृती केली आणि प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचविले. त्यामुळे या अळीला प्रतिबंध घालता आला. यावेळी प्रताप रणखांब, नवीन सोनी, संजय चांदूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाय शेतकऱ्यांनीही आपले अनुभव मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com