विद्यापीठातील संशोधन बांधापर्यंत पोचत नाही ः दिलीप वळसे पाटील

University research does not reach dam: Dilip Valase Patil
University research does not reach dam: Dilip Valase Patil

नारायणगाव, जि. पुणे : पारंपरिक शेती परवडत नाही. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशातील कृषी विद्यापीठातील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचत नाही. कृषी संशोधकांचा संपर्क सामान्य शेतकऱ्यांशी नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही, अशी खंत राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) वतीने नऊ जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान चार दिवस ग्लोबल फार्मस कृषी प्रदर्शनाअंतर्गत पीक प्रात्यक्षिके व पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.गुरुवारी (ता. ९) दुपारी झालेल्या कार्यक्रमात कृषी प्रदर्शनाचे व कृषी पत्रिकेचे उद्‌घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रगतशील शेतकरी, उद्योजक, कृषी अधिकारी, पत्रकार यांचा सत्कार आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, सभापती संजय काळे, आशा बुचके यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर होते. या वेळी आयसीआर पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, तात्यासाहेब गुंजाळ, गणपतराव फुलवडे, गुलाबराव नेहरकर, राजश्री बोरकर, पांडुरंग पवार, शरद लेंडे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, विश्‍वस्त नंदाताई डांगे, श्रीकांत विद्वांस, कार्यवाह रवींद्र पारगावकर, संचालक शशिकांत वाजगे, डॉ. संदीप डोळे, सुजित खैरे आदी मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘देशाची आर्थिक, औद्योगिक स्थिती, घसरणारा विकास दर पाहता पारंपरिक शिक्षण व शेती कुचकामी ठरत आहे. तरुणांनी घेतलेली पदवी उपजीविकेचे साधन निर्माण करू शकत नाही. उत्पन्नाचे साधन कसे मिळवायचे असा प्रश्‍न पदवीधर तरुणांपुढे आहे. या परिस्थितीत कृषी विद्यापीठे, केव्हीके या संस्थांनी कृषीविषयक संशोधनाचा प्रसार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत करावा. बदलते हवामान, बाजारभाव, शेतीपूरक व्यवसाय, बाजारपेठा, तंत्रज्ञान आदींची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. तरुणांनी नवीन दृष्टी घेऊन शेती करावी,’’ असा सल्ला या वेळी वळसे पाटील यांनी दिला.

या वेळी आमदार मोहिते पाटील, बेनके, बुचके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील ढवळे, मेहबूब काझी यांनी केले. नियोजन प्रशांत शेटे, राहुल घाडगे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com