पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच एकर क्षेत्रात बांबू पार्क उभारण्यात येणार आहे. गॅरेट मोशन टेक्नॉलॉजी या कंपनीने ६८ लाख ८५ हजारांचा निधी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) देण्यात आला आहे.
विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’University to set up 'bamboo park'
विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’University to set up 'bamboo park'

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच एकर क्षेत्रात बांबू पार्क उभारण्यात येणार आहे. गॅरेट मोशन टेक्नॉलॉजी या कंपनीने ६८ लाख ८५ हजारांचा निधी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) देण्यात आला आहे. या बाबतच्या करारावरावर सोमवारी (ता. १९) स्वाक्षरी करण्यात आली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, नवोपक्रम, डॉ. अपूर्वा पालकर, युनायटेड फॉर नेशन या संस्थेचे संचालक सुमेध बडवे आदी यावेळी उपस्थित होते.

सीएसआर अंतर्गत होणारा हा प्रकल्प ‘गॅरेट मोशन टेक्नॉलॉजी’ ही कंपनी ‘युनायटेड फॉर नेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राबविणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यापीठातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील ५ एकर क्षेत्रावर पार्क उभारण्यात येणार आहे. विद्यापीठातील बांबू सेंटरला या प्रकल्पाचा उपयोग होईल. बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन निधी उभा राहण्यास मदत होईल. असा विश्‍वास कुलगुरूंनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया

विद्यापीठात अशा प्रकारे बांबू पार्क पहिल्यांदाच उभारले जात आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याबरोबरच विद्यापीठाला अर्थार्जन करणे हा या बांबू पार्क उभारण्यामागील हेतू आहे.  -प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com