Agriculture news in marathi Unlimited purchase limit of urad and green gram in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक कार्यवाही सुरू झाली आहे. परंतु, यासंदर्भातील ऑनलाइन नोंदणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद आहे.

जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक कार्यवाही सुरू झाली आहे. परंतु, यासंदर्भातील ऑनलाइन नोंदणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद आहे. मूग विक्रीसाठी जळगाव, पाचोरा व अमळनेर येथील तीन खरेदी केंद्रांवर एकही नोंदणी झालेली नाही. 

मुगाचा शासकीय दर ७१९६ रुपये प्रतिक्विंटल, तर उडदाचा शासकीय खरेदी दर ६००० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. या दरात मूग, उडदाची खरेदी शासकीय केंद्रात केली जाईल. खरेदी सुरू करण्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही. परंतु, तीन ठिकाणी खरेदी केंद्र निश्चित करून ऑनलाइन नोंदणी गेल्या मंगळवारी (ता.१५) सुरू झाली आहे.

यात उडीद विक्रीसाठी जळगाव येथील केंद्रात शनिवारपर्यंत (ता.१९) १५ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली होती. पाचोरा व अमळनेर येथील केंद्रातही उडीद विक्रीसंबंधी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. 

मूग विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यात कुठल्याही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही. मुगाचे पीक अतिपावसात १०० टक्के वाया गेले आहे. तर, उडदाची मळणी अनेक भागात राहिली आहे. मळणी करून काही भागात शेतकरी उडीद वाळवून घेणे, त्याची स्वच्छता, प्रतवारी आदी कार्यवाही करून घेत आहेत. 

उडीद व मूग खरेदीची मर्यादा जाहीर झालेली नाही. कृषी विभागाचा पीक कापणी अहवाल आलेला नाही. कृषी विभागाकडे मूग व उडीद उत्पादकतेची माहिती मार्केटिंग फेडरेशनने मागितली आहे. परंतु, ही माहिती कृषी विाभागाने सादर केलेली नाही. खरेदीची किती करायची व केव्हापासून करायची, याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत.

यामुळे खरेदीसंबंधीची प्राथमिक तयारी करून ठेवली आहे. गोदामे सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात मुगाचे, उडदाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे यंदा शासकीय मूग, उडीद खरेदीला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

खरेदीसाठी तीन केंद्रांमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. मूग विक्रीसाठी कुठल्याही केंद्रात नोंदणी झालेली नाही. उडीद विक्रीसाठी प्रतिसाद मिळत आहे. पुढे याबाबत प्रतिसाद मिळू शकतो. 
- गजानन मगरे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...